कोरोना व्हायरसपेक्षा देखील बॉलिवूडमधील या गायिकेला गुगलवर सर्वाधिक करण्यात आले सर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 11:10 IST2020-12-24T11:04:19+5:302020-12-24T11:10:48+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी लोकांनी कोरोना व्हायरसपेक्षा देखील बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गायिकेविषयी सर्च केले आहे.

कोरोना व्हायरसपेक्षा देखील बॉलिवूडमधील या गायिकेला गुगलवर सर्वाधिक करण्यात आले सर्च
२०२० मध्ये कोरोना व्हायरसने प्रचंड थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस म्हणजे काय, त्याची लक्षणं काय असतात, त्याच्यावर काय उपचार आहेत याबाबत अनेक गोष्ट सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून लोक सोशल मीडियावर शोधत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी गोष्ट कोरोना व्हायरस आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी लोकांनी कोरोना व्हायरसपेक्षा देखील बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गायिकेविषयी सर्च केले आहे.
नेहा कक्करने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला होता. त्यात आपल्याला तिचा बेबी बम्ब पाहायला मिळाला होता. नेहाच्या या फोटोमुळे आणि या फोटोसोबत तिने आणि तिचा नवरा रोहनप्रीतने लिहिलेल्या कमेंटमुळे ती प्रेग्ननंट आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. नेहाने या फोटोसोबत खयाल रख्या कर... (काळजी घेत जा...) असे लिहिले होते तर रोहनप्रीतने अब तो कुछ ज्यादा ही ख्याल रखना पडेगा नेहू (आता तर खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार नेहू) अशी कमेंट लिहिली होती. त्यामुळे नेहाकडे गुड न्यूज तर नाही ना असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट होता.
नेहाने तिच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती आणि त्यामुळे गुगलवर देखील नेहाच्या प्रेग्नन्सीविषयीच सगळ्याच जास्त सर्च करण्यात आला. लोकांना नेहा कक्करच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेत किती रस होता हे यातून दिसून आले आहे. या आठवड्यात कोरोना व्हायरसपेक्षा नेहा कक्कर या नावाने गुगलवर अधिक सर्च करण्यात आले.
गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले होते. रोहनप्रीत सिंगच्या घरी नवोदित वधू नेहा कक्करचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात नेहा आणि रोहनप्रीत ढोलच्या तालावर थिरकताना दिसले होते.