का झाले नेहा कक्कर व हिमांश कोहलीचे ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 15:43 IST2019-02-10T15:43:07+5:302019-02-10T15:43:12+5:30

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिचे काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आणि या ब्रेकअपने नेहाला सैरभैर केले. या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडायला तिला बराच वेळ लागला. पण आता नेहा यातून बाहेर पडलीय.

neha kakkar open secretes after breakup with himansh kohl | का झाले नेहा कक्कर व हिमांश कोहलीचे ब्रेकअप?

का झाले नेहा कक्कर व हिमांश कोहलीचे ब्रेकअप?

ठळक मुद्देनेहा व हिमांश दोघेही ओह हमसफर  या व्हिडिओत एकत्र दिसले होते.

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिचे काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आणि या ब्रेकअपने नेहाला सैरभैर केले. या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडायला तिला बराच वेळ लागला. पण आता नेहा यातून बाहेर पडलीय. आता तर हिमांश माझ्या योग्यतेचाच नव्हता, असे नेहाने म्हटलेय.
होय, ताज्या मुलाखतीत नेहा तिच्या ब्रेकअपबद्दल बोलली. या ब्रेकमागचे खरे कारण तिने सांगितले. मी प्रचंड बिझी होते,आत्ताही आहे. पण या बिझी शेड्यूलमधूनही मी माझा वेळ हिमांशला देत होते. मात्र  तरीही मी वेळ देत नाही अशी त्याची तक्रार असायची. खरे तर मी त्याला माझा अमूल्य द्यावा, इतकीही त्याची योग्यता नव्हती. जो माझ्या योग्यतेचाच नाही, त्याच्यावर मी माझा संपूर्ण वेळ आणि ऊर्जा वाया घालवत होती, असे नेहा म्हणाली.

दुस-यांदा प्रेमात पडणार का, असा प्रश्न नेहाला केला गेला, यावरही तिने बिनधास्त उत्तर दिले. मी दुसºयांदा अजिबात प्रेमात पडणार नाही. माझं ब्रेकअप झालंय, ही माझ्या आयुष्यात घडलेली सर्वाधिक चांगली गोष्ट आहे. सिंगल असणे ही माझ्या आयुष्यातील बेस्ट फिलींग आहे. आता मी हॅपी स्पेसमध्ये आहे. कुटुंबापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, हे मला कळले, असे ती म्हणाली.

यापूर्वी एका वेबपोर्टलने नेहाला हिमांशबद्दल विचारले होते. हिमांशचे नाव ऐकताच नेहाने त्याला ओळखण्यास नकार दिला होते. कौन हिमांश...मैं इस नाम के किसी भी शख्स को नहीं जानती हूं, असे नेहा म्हणाली होती. कृपया मला एकटे सोडा, अशी विनंतीही नेहाने केली होती. नेहा व हिमांश या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. केवळ इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे स्वत:चे सर्व व्हिडिओ व फोटो आपल्या सोशल अकाऊंटवरून डिलिट केले आहेत. नेहा व हिमांश दोघेही ओह हमसफर  या व्हिडिओत एकत्र दिसले होते.

Web Title: neha kakkar open secretes after breakup with himansh kohl