Neha Kakkar Rohanpreet Wedding : नेहा कक्करची वऱ्हाडीमंडळी रवाना झाली दिल्लीला, समोर आला फोटो
By गीतांजली | Updated: October 22, 2020 13:05 IST2020-10-22T12:55:35+5:302020-10-22T13:05:23+5:30
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

Neha Kakkar Rohanpreet Wedding : नेहा कक्करची वऱ्हाडीमंडळी रवाना झाली दिल्लीला, समोर आला फोटो
बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अद्याप नेहूप्रीतच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा झालेला नाही, मात्र अंदाज आहे की याच महिन्याच्या शेवटी नेहा नववधू होईल..नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दिल्लीत होणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती अखेर ती खरी ठरली. नेहाने स्वत: हा खुलासा केला आहे की, 'नेहू दा व्याह' दिल्लीतच होणार.
नेहाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका फोटो पोस्ट केला आहे, नेहाने या फोटोसह जे कॅप्शन लिहिले आहे ते सांगण्यासाठी पुरेसे आहे की तिचे लग्न दिल्लीमध्ये होणार आहे. नेहा आपल्या कुटुंबियांसोबत दिल्लीला रवाना झाली आहे. फोटोमध्ये नेहा तिचा भाऊ टोनी कक्कर आणि मोठी बहीण सोनू कक्कर यांच्यासोबत फ्लाईटमध्ये दिसतेय.
फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'चला नेहू प्रीतच्या लग्नाला'. आता या कॅप्शनद्वारे हे स्पष्ट झाले आहे की नेहा आणि रोहनप्रीत या महिन्याच्या अखेरीस लग्न करणार आहेत.
अलीकडेच नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या रोका सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात दोघेही डान्स करताना दिसले होते. दिल्लीत लग्न झाल्यावर पंजाबमध्ये रिसेप्शन होणार आहे.