नेहा धुपियाने लॉकडाऊनमध्ये कमी केलं चक्क 21 किलो वजन, म्हणाली- आई झाल्यावर लोक ट्रोल करत होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:49 IST2021-02-05T15:42:25+5:302021-02-05T15:49:23+5:30
नेहा धुपिया तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते.

नेहा धुपियाने लॉकडाऊनमध्ये कमी केलं चक्क 21 किलो वजन, म्हणाली- आई झाल्यावर लोक ट्रोल करत होते
नेहा धुपिया तिच्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाते. ती ट्रॉलर्सनाही सडेतोड उत्तर देते असते. ट्रोलिंगमुळे त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे. मुलगी मेहरला जन्म दिल्यानंतर तिचे वजन 23-25 किलोने वाढले होते. 8 महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये तिने 21 किलो वजन कमी केले आहे.
नेहा धूपियाची मुलगी मेहरचा जन्म नोव्हेंबर २०१८ मध्ये झाला होता. मुलीच्या जन्मानंतर तिच्यात बरेचसे बदल झाले आणि तिचे वजनही वाढले. यावर नेहा म्हणाली की,याबाबत माझ्या मनात काही नेगेटीव्ह नव्हते पण मला फॅट-शेम केले जात होते.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली की ८ महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये तिने २१ किलो वजन कमी केले. तिचे म्हणणे आहे की, प्रेग्नेंन्सीदरम्यान तिचे वजन जवळपास २५ किलोने वाढले होते. यासाठी तिला ट्रोल केलं जायचं आणि जज सुद्धा करण्यात आले. अगदी असे म्हटले गेले होते की तिचे फिल्मी करिअर संपणार.
नेहा म्हणाली की, लोक मला फॅट शेमिंग करत होते. त्यांचे म्हणणे असे होते की, तिचे आयुष्य आणि करिअर थांबले. तिने हे सगळं धीराने घेतले आणि वजन हळू हळू कमी होऊ दिले. नेहा म्हणते, लॉकडाऊनमध्ये मी एक गोष्ट केली की लोक माझ्याबद्दल काय बोलतात याची मी चिंता केली नाही आणि ८ महिन्यांत 21 किलो वजन कमी झाले.