Ranbir Alia Wedding: लेकाच्या लग्नात या गाण्यावर थिरकणार नीतू कपूर, रिहर्सल व्हिडीओ लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 01:53 PM2022-04-14T13:53:10+5:302022-04-14T13:55:04+5:30

Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding: रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये.याचदरम्यान नीतू कपूर यांच्या डान्स रिहर्सलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Neetu Kapoor to rock this song at Leka's wedding, rehearsal video leaked | Ranbir Alia Wedding: लेकाच्या लग्नात या गाण्यावर थिरकणार नीतू कपूर, रिहर्सल व्हिडीओ लीक

Ranbir Alia Wedding: लेकाच्या लग्नात या गाण्यावर थिरकणार नीतू कपूर, रिहर्सल व्हिडीओ लीक

googlenewsNext

Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding: लेकाचं लग्न होतंय म्हटल्यावर आई आनंदात असणारच. नीतू कपूर सध्या जाम आनंदात आहेत. रणबीर (Ranbir Kapoor) व आलिया भटचं (Alia Bhatt) लग्न होतंय म्हटल्यावर त्यांच्या आनंद ओसंडून वाहतोय. थोड्याच वेळात आलिया व रणबीर लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये.याचदरम्यान नीतू कपूर यांच्या डान्स रिहर्सलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

या व्हिडीओत नीतू माधुरी दीक्षित व माधुरी दीक्षितच्या ‘लडके ओ रे लडके कहां से आया है रे तू...,’ या गाण्यावर थिरकताना दिसताहेत. आलिया व रणबीरच्या लग्नात नीतू याच गाण्यावर थिरकणार आहेत.

व्हिडीओत नीतू कोरिओग्राफर व डान्स मास्टर राजेंद्र सिंह यांच्यासोबत दिसत आहेत. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण कपूर कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात डान्स असेल तर  राजेंद्र सिंह हेच डान्स बसवतात. या डान्स व्हिडीओवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे नीतू कपूर लेकाच्या लग्नात मस्त धम्माल करणार आहेत.

या डान्स रिहर्सल व्हिडीओआधी नीतू कपूर यांनी हातावरच्या मेहंदीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. काल 13 एप्रिलला रणबीर व नीतू यांची मेहंदी सेरेमनी झाली. यावेळी नीतू यांनी ऋषी कपूर यांचं नाव आपल्या हातांवर लिहिलं. याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रिपोर्टनुसार, मेहंदी सेरेमनीत नीतू यांनी ऋषी कपूर यांचे काही किस्से शेअर केलेत. यावेळी त्या भावुक झाल्यात.

Web Title: Neetu Kapoor to rock this song at Leka's wedding, rehearsal video leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.