ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 18:51 IST2019-07-04T18:51:30+5:302019-07-04T18:51:58+5:30

आता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी क्रिकेटर कपिल देव न्यूयॉर्क येथे गेले आहेत. नीतू कपूर यांनी त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Neetu kapoor shares a super charged selfie on social media with rishi kapoor and kapil-dev | ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर

ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर बऱ्याच कालावधीपासून न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषी कपूर यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली असून ते त्यांच्या वाढदिवसा आधी भारतात परतण्याची शक्यता आहे. या दरम्यान शाहरूख खान, आमीर खान, प्रियंका चोप्रा, आलिया भट, करिश्मा कपूक, विकी कौशल, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन ऋषी यांना भेटले आहेत. या भेटीचे फोटो नीतू कपूरने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. 


आता ऋषी कपूर यांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यासाठी माजी क्रिकेटर कपिल देव न्यूयॉर्कला गेले आहेत. नीतू कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या तिघांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऋषी कपूर आधीपेक्षा चांगले दिसत आहेत. नीतू कपूरने फोटो शेअर करून लिहिलं की, सुपर चार्च्ड अबाऊट वर्ल्ड कप.


नुकतेच फादर्स डेच्या निमित्ताने मुलगी रिद्धिमा कपूरदेखील वडील ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी गेली होती. हा स्पेशल दिवस त्यांनी मुलगी रिद्धिमा व नातीसोबत साजरा केला होता. हा फोटो रिद्धिमाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून लिहिले होते की, हॅप्पी फादर्स डे. माझ्या आयुष्यातील हिरो. तुम्हाला खुप सारे प्रेम.


ऋषी कपूर इतक्या मोठ्या कालावधीनंतर झूठा कहीं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं ऋषी कपूर यांनी न्यूयॉर्कला जाण्याआधी शूटिंग केलं होतं.

या चित्रपटात त्यांच्याशिवाय जिमी शेरगिल, सनी सिंह व ओमकार कपूर हे कलाकार आहेत. हा चित्रपट १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Neetu kapoor shares a super charged selfie on social media with rishi kapoor and kapil-dev