VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:41 IST2022-04-28T12:36:43+5:302022-04-28T12:41:37+5:30

गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांनी लग्नगाठ बांधली.  आलिया भट आता कपूर कुटुंबाची सून आहे. सध्या हे कपल या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती नव्या सूनबाईंची.

neetu kapoor on bahu alia bhatt neetu kapoor reaction to daughter-in-law alia | VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर

VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर

गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांनी लग्नगाठ बांधली.  आलिया भट आता कपूर कुटुंबाची सून आहे. सध्या हे कपल या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती नव्या सूनबाईंची. लग्नानंतर काहीच दिवसांत आलिया भट कामावर परतली. पण लग्नानंतरची नवलाई अद्याप संपलेली नाही. सासूबाई संधी मिळेल तिथे सूनबाईचं कौतुक करत आहेत. 

काल नीतू कपूर (Neetu Kapoor)  एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर दिसल्या आणि त्यांना पाहून पापाराझींना त्यांना गाठलं. मग काय, सूनबाईबद्दलचा प्रश्न असणारच. नवी सूनबाई कशी आहे? असा प्रश्न पापाराझींनी नीतू यांना केला. यावर बढिया है... बढीया... बहुत बढिया... असं नीतू म्हणाल्या.  यावेळी नीतू यांच्या उत्तरापेक्षा त्यांच्या हावभावाने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यावेळी त्या फारच उत्साहात दिसल्या. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने नीतू यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. नीतू यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला ‘फूल्ल ड्रामा’ म्हटलं आहे तर काहींना याला ‘ओव्हरअ‍ॅक्टिंग’ म्हटलं आहे.

 14 एप्रिलला आलिया  आणि रणबीर लग्नबंधनात अडकले.  लग्नानंतर नीतू कपूर यांनी लेकाच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अजूनही सोशल मीडियावर या फोटो आणि व्हिडीओची चर्चा होत असते, सोबतच नीतू कपूर आणि आलिया यांच्या सुंदर बॉन्डिंगचीसुद्धा चर्चा सुरू असते. नीतू यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच त्या ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटात झळकणार आहेत. यात अनिल कपूर, वरूण धवन, कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: neetu kapoor on bahu alia bhatt neetu kapoor reaction to daughter-in-law alia