नीतू चंद्राची ‘उमराव जान’ जाणार विदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 17:55 IST2016-09-25T10:38:00+5:302016-09-25T17:55:29+5:30
गरम मसाला’, ‘ओय लक्की, लक्की ओय!’ अशा चित्रपटांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री नीतू चंद्रा एका नाटकात काम करत असून या ...

नीतू चंद्राची ‘उमराव जान’ जाणार विदेशात
ग म मसाला’, ‘ओय लक्की, लक्की ओय!’ अशा चित्रपटांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री नीतू चंद्रा एका नाटकात काम करत असून या नाटकाचे प्रयोग अमेरिका, कॅनडा आणि युरोपात होणार आहेत.
‘उमराव जान’ या नाटकात ती मुख्य भूमिकेत असून लवकरच ती नाटकाच्या दौऱ्यावर जाणार आहे. सुमारे एक महिन्याच्या काळात विदेशात विविध ठिकाणी नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
उमराव जानची आयकॉनिक भूमिका साकारायला मिळणार म्हणून ती जाम खुश आहे. ती म्हणते, ‘प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते की, उमराव जानसारखी भूमिका आयुष्यात एकदा तरी साकारायला मिळावी. मला तर ती लाईव्ह स्टेजवर रंगवण्याची संधी मिळाली म्हणून माझ्या आनंदाला काही पारावारच उरला नाही.’
यापूर्वी रेखा आणि ऐश्वर्या राय-बच्चन यासारख्या दिग्गज अभिनेत्रींनी चित्रपटांतून उमराव जानचे पात्र साकारलेले आहे.