15 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत डेब्यू केलेली ही अभिनेत्री आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:34 IST2020-04-13T16:18:22+5:302020-04-13T16:34:18+5:30

'गरम मसाला'मुळे ती लाईमलाईटमध्ये आली होती.

Neetu chandra away from bollywood since 2011 gda | 15 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत डेब्यू केलेली ही अभिनेत्री आता दिसते अशी

15 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत डेब्यू केलेली ही अभिनेत्री आता दिसते अशी

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या पहिल्यासिनेमानंतर गायब होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबाबत सांगणार आहोत. अक्षय कुमार सोबत 2005 मध्ये नीतू चंद्राने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. 

नीतू चंद्राने 2005 मध्ये आलेल्या गरम मसाला सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात तिने अक्षय कुमारच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. नीतूच्या भूमिकेचे नाव स्वीटी होते. गरम मसालामुळे नीतू लाईमलाईटमध्ये आली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. या सिनेमानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. 

गरम मसाला नंतर ट्रॉफिक सिग्नल, वन टू थ्री, समर 2007, ओए लकी! लकी ओए! अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली होती. बॉलिवूडशिवाय तिने तमिळ, तेलुगू , कन्नड आणि भोजपुरी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. नीतू शेवटची कुछ लव जैसा या सिनेमात दिसली होती. हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. 

बिहारच्या आरामध्ये राहणाऱ्या नीतूची भोजपुरी मातृभाषा आहे. तिचे प्राथमिक शिक्षण पटनामध्ये झाले त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तिने दिल्ली गाठली. सिनेमांमध्ये येण्याआधी नीतू मॉडलिंग करायची.  बॉलिवूडपासून नीतू जरी लांब असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. 

Web Title: Neetu chandra away from bollywood since 2011 gda