‘नीरजा’च्या निर्मात्यांनी केली नीरजा भनोटच्या परिवाराची फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 21:19 IST2017-05-20T15:49:31+5:302017-05-20T21:19:31+5:30
गेल्यावर्षी रिलीज झालेला अभिनेत्री सोनम कपूर हिचा ‘नीरजा’ हा चित्रपट कायदेशीर प्रक्रियेत अतिशय खडतरपणे अडकला असल्याचे दिसून येत आहे. ...

‘नीरजा’च्या निर्मात्यांनी केली नीरजा भनोटच्या परिवाराची फसवणूक!
ग ल्यावर्षी रिलीज झालेला अभिनेत्री सोनम कपूर हिचा ‘नीरजा’ हा चित्रपट कायदेशीर प्रक्रियेत अतिशय खडतरपणे अडकला असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करताना घवघवीत यश मिळविले होते. चित्रपटात ‘नीरजा’ची भूमिका साकारणाºया सोनमचे त्यावेळी सर्वत्र कौतुकही केले गेले. शिवाय या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. मात्र असे असतानाही हा चित्रपट वादाच्या भोवºयात अडकला आहे.
वास्तविक या चित्रपटाच्या सुरुवातीलाच ब्लिंग एंटरटेनमेंट सोल्युशन लिमिटेडवर भनोट ब्रदर्सने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. नीरजा भनोटचे भाऊ अखिल आणि अनिसने चित्रपट निर्मात्यांवर आरोप केला होता की, करारानुसार चित्रपटाच्या नफ्याचे योग्यरीत्या वाटप केले गेले नाही. नीरजा भनोटचे भाऊ अखिल आणि अनीस भनोट या चित्रपटाचे को-प्रोड्यूसर राहिले आहेत.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लिंगने नीरजाची आई रमा यांच्याबरोबर चित्रपटाच्या निर्मिती अगोदरच एक करार केला होता. ज्यानुसार शहीदच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करता येते. तसेच चित्रपटाच्या एकूण कमाईतून दहा टक्के हिस्सा भनोट परिवाराला देणे होते. मात्र निर्मात्यांनी अद्यापपर्यंत ही रक्कम दिली नसल्याचा आरोप भनोट ब्रदर्सनी केला आहे. तर यावर खुलासा करताना ब्लिंगच्या वतीने सांगण्यात आले की, ऐनवेळी दुसºया कंपनीचा सहभाग घ्यावा लागल्याने त्यांना कमी नफा मिळाला. तसेच भनोट ब्रदर्सला त्यातून कमी रक्कम दिली गेली.
सोनम कपूरने या चित्रपटात धाडसी मुलगी नीरजा भनोट हिची दमदार भूमिका साकारली होती. दहशतवाद्यांनी १९८६ मध्ये एका विमानाचे अपहरण करून प्रवाशांना बंदी बनविले होते. विमानात एयरहॉस्टेस असलेल्या नीरजाने अतिशय धाडसाने सर्व प्रवाशांचा जीव वाचविला होता. मात्र यासाठी तिला बळी पडावे लागले. दहशतवाद्यांनी तिला गोळ्या झाडून ठार मारले होते. नीरजाच्या या धाडसासाठी तिला केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान आणि अमेरिकेतही सन्मानित करण्यात आले होते. नीरजाच्या याच धाडसाची कथा सोनम कपूर हिने ‘नीरजा’ या चित्रपटात पडद्यावर साकारली आहे.