नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ताचे पतीसोबत ‘ट्रायल सेपरेशन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 11:49 IST2018-08-26T11:46:45+5:302018-08-26T11:49:55+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे.

Neena Gupta's Lake Massa Gupta's 'Trial Separation' with her husband! | नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ताचे पतीसोबत ‘ट्रायल सेपरेशन’!

नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ताचे पतीसोबत ‘ट्रायल सेपरेशन’!

दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची लेक मसाबा गुप्ता ही पतीपासून वेगळी झाली आहे. होय, खुद्द मसाबाने ही घोषणा केली. मसाबाचा पती मधु मंटेना एक निर्माता आहे. मसाबाने शनिवारी एक अधिकृत निवेदन जारी करून पतीपासून विभक्त होत असल्याचा निर्णय जाहिर केला. ‘मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून अनेक विचारांती आम्ही एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वत:ला खासगी आयुष्यात काय हवे, यामुळे अनावश्यकरित्या आमच्या लग्नावर व प्रेमावर दबाव जाणवत होता. त्यामुळे आम्ही ट्रायल सेपरेशन घेण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही काही काळ या लग्नापासून दूर राहू आणि आम्हाला आयुष्यात काय हवे, हे समजून घेऊ. हा आमच्यासाठी कठीण निर्णय आहे. आमच्या खासगीपणाचा आदर केला जावा, ही अपेक्षा’ असे मसाबाने म्हटले आहे.


मसाबाने सन २०१५ मध्ये मंटेनासोबत लग्न केले होते. बॉलिवूडची प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झालेले नाही. मसाबाचा पती मधू हे फँटम फिल्म्सचे को-फाउंडर आहेत.   त्याने गजनी, रण, रक्त चरित्र, झुठा ही सही, मौसम या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Web Title: Neena Gupta's Lake Massa Gupta's 'Trial Separation' with her husband!