​नीना गुप्ता यांना का मागावे लागले सोशल मीडियावर काम? वाचा या प्रश्नाचे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 07:57 AM2017-08-03T07:57:20+5:302017-08-03T13:27:20+5:30

आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता अलीकडे सोशल मीडियावर काम मागतांना दिसली. सोशल ...

Why did Neena Gupta get to work on social media? Read the answer to this question! | ​नीना गुप्ता यांना का मागावे लागले सोशल मीडियावर काम? वाचा या प्रश्नाचे उत्तर!

​नीना गुप्ता यांना का मागावे लागले सोशल मीडियावर काम? वाचा या प्रश्नाचे उत्तर!

googlenewsNext
ल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीना गुप्ता अलीकडे सोशल मीडियावर काम मागतांना दिसली. सोशल मीडियावरची नीना गुप्ता यांची काम मागणारी पोस्ट वाचून अनेकांना धक्का बसला. बघता बघता ही पोस्ट व्हायरल झाली. अखेर नीना गुप्तासारख्या प्रगल्भ अभिनेत्रीवर वयाच्या ६२ वर्षी काम मागण्याची वेळ का यावी आणि तीही सोशल मीडियावर? असा प्रश्न यानंतर अनेकांना पडलाय.
गेल्या काही दिवसांपासून हैरान करणा-या या प्रश्नाचे उत्तर स्वत: नीना गुप्ता यांनीच दिले आहे. यामागचे कारण अगदी सहज-साधे आहे. ‘सन २००८ मध्ये लग्नानंतर मी मुंबई सोडली आणि आता निवडक भूमिकाच करतेय, असा लोकांचा समज झाला आहे. तो दूर करण्यासाठी मी पोस्ट टाकली,’ असे नीना यांनी सांगितले. खरे तर ही पोस्ट टाकताना मनातून मी घाबरले होते. माझी ही पोस्ट माझ्या विनोदाचे कारण बनू नये, असे मला वाटत होते. पण पोस्ट टाकल्यानंतर लोकांचे प्रोत्साहन आणि मुलगी मसाबा हिच्या भावना वाचून माझ्यात नवा विश्वास संचारला. आता मला सशक्त भूमिकांची प्रतीक्षा आहे, असेही नीना म्हणाल्या. फिल्म इंडस्ट्रीत आले तेव्हा अमिताभ बच्चन सारखे बनण्याचे स्वप्न मी उराशी बाळगून होते. पण प्रत्यक्षात मी या स्वप्नाच्या जवळपासही पोहोचू शकलेली नाही. सुंदरचा गरजेची नाही तर अभिनय गरजेचा आहे,असा माझा समज होता. मी सुंदर अभिनय करते, म्हणून लोक माझ्या मागे येतील, असे मला वाटले होते. पण असे झाले नाही. माझी आई मला आयपीएस अधिकारी बनवू इच्छित होती.   मी चुकीच्या प्रोफेशनमध्ये तर नाही ना, असा विचार कधीकधी अजूनही माझ्या डोक्यात येतो, असेही त्या म्हणाल्या.

ALSO READ : नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर मागितले काम!!

पुढे त्यांनी सांगितले की, मला आजीच्या भूमिका करण्यात रस नाही. माझ्यासारख्या अभिनेत्रींसाठी बॉलिवूडमध्ये फार काम नाही. अभिनेत्री अधिक आहेत आणि काम कमी. तिशीत असलेल्या अभिनेत्रींना आईची भूमिका दिली जात आहे आणि माझ्या वयाचे अभिनेते आजही हिरो म्हणून मिरवत आहेत. खरे तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आपला समाजच असा आहे. बदल व्हायला आणखी बराच काळ लागेल.

Web Title: Why did Neena Gupta get to work on social media? Read the answer to this question!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.