"सेक्स एन्जॉय करण्यासाठी असतो हे महिलांना माहीतच नाही", नीना गुप्ता यांचं बोल्ड वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:28 IST2025-04-04T13:27:27+5:302025-04-04T13:28:04+5:30

नीना गुप्ता यांनी भारतातील महिला आणि त्यांचे शारीरिक संबंधाबद्दल असलेले विचार यावर बोल्ड वक्तव्य केलं आहे.

neena gupta talk about sex said women dont know that it should get enjoy | "सेक्स एन्जॉय करण्यासाठी असतो हे महिलांना माहीतच नाही", नीना गुप्ता यांचं बोल्ड वक्तव्य

"सेक्स एन्जॉय करण्यासाठी असतो हे महिलांना माहीतच नाही", नीना गुप्ता यांचं बोल्ड वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या अभिनयाबरोबरच त्यांच्या बोल्ड व्यक्तिमत्वासाठीही ओळखल्या जातात. अगदी परखडपणे नीना गुप्ता त्यांचे विचार आणि मत अगदी स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी भारतातील महिला आणि त्यांचे शारीरिक संबंधाबद्दल असलेले विचार यावर बोल्ड वक्तव्य केलं आहे. 

नीना गुप्ता यांनी नुकतीच लिली सिंगच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारतीय महिला आणि सेक्सविषयी भाष्य केलं.

काय म्हणाल्या नीना गुप्ता? 

"सेक्सला आपल्याकडे फारच ओव्हररेटेड केलं आहे. भारतातील महिलांसाठी मला फार वाईट वाटतं. ९५ टक्के भारतीय महिलांना हे माहीतच नाही की सेक्स हा एन्जॉय करण्यासाठी असतो. त्यांना असं वाटतं की सेक्स फक्त पुरुषांना आनंद देण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी आहे. बहुतांश लोकांना असंच वाटतं की सेक्स हे आनंदासाठी नाही. त्यामुळे मला वाटतं की ते फारच ओव्हररेटेड करून ठेवलं आहे".

नीना गु्प्ता गेल्या कित्येक वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'पंचायत', 'लस्ट स्टोरीज' या वेब सीरिजमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. 'बधाई हो', 'गुडबाय', 'वध', 'स्वर्ग', 'वीरे दी वेडिंग', 'दर्द', 'मिर्झा गालिब' या सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. 

Web Title: neena gupta talk about sex said women dont know that it should get enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.