Mr. and Mrs. Shivan! लग्नानंतर पतीसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली नयनतारा, पाहून सगळेच घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 04:52 PM2022-06-12T16:52:25+5:302022-06-12T16:54:14+5:30

Nayanthara Photos: नयनताराचा अंदाज सर्वांनाच घायाळ करून गेला. पिवळ्या साडीत अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या नयनताराला पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.

nayanthara spotted with husband vignesh shivan after marriage | Mr. and Mrs. Shivan! लग्नानंतर पतीसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली नयनतारा, पाहून सगळेच घायाळ

Mr. and Mrs. Shivan! लग्नानंतर पतीसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली नयनतारा, पाहून सगळेच घायाळ

googlenewsNext

साऊथ लेडी सुपरस्टार नयनताराने  (Nayanthara) गेल्या 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Nayanthara-Vignesh Shivan) लग्नगाठ बांधली. तामिळनाडूच्या महाबलीपूरम येथे या जोडप्याचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर लगेच नयनतारा व विग्नेश तिरूपती मंदिरात दर्शनसाठी गेले होते. यावेळी नयनताराने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. यानंतर नयनतारा व विग्नेश यांनी  एका पत्रकार परिषदेत हजेरी लावली. लग्नानंतर खास मीडियाला भेटण्यासाठी या पत्रकार परिषदेतचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी नयनतारा पुन्हा एकदा पिवळ्या रंगाच्य साडी दिसली. तिचा अंदाज सर्वांनाच घायाळ करून गेला. पिवळ्या साडीत अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या नयनताराला पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. भांगेत कुंकू, अंगभर सोन्याचे दागिने अशा थाटात पती विग्नेशचा हात धरून नयनने इव्हेंटमध्ये एन्ट्री घेतली. तिचा पारंपरिक लुक, तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघण्यासारखा होता.

लवकरच रिसेप्शन
नयनतारा व विग्नेश लग्नानंतर एक ग्रँड रिसेप्शन देणार असल्याची माहिती आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नानंतर कपल साऊथच्या काही ठिकाणांना भेट देणार आहेत. नयनताराच्या होमटाऊनलाही दोघं भेट देणार आहेत. यानंतर दोघांचं रिसेप्शन होणार आहे. यासाठी चेन्नईच्या प्राईम लोकेशनची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. या रिसेप्शनमध्ये साऊथ इंडस्ट्रीतले अनेक दिग्गज हजेरी लावू शकतात.

नयनताराने नुकताच ‘जवान’ हा सिनेमा साईन केला आहे. या चित्रपटात ती बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. काही दिवसानंतर नयनतारा या चित्रपटाचं शूटींग सुरू करणार आहे.

नयनतारा व विग्नेशच्या लग्नातील लुक खास होता. नयनताराने लाल रंगाची साडी परिधान केली होती. यावर तिने कुंदन आणि हिºयाची ज्वेलरी घातली होती. विग्नेशने क्रिम कलरची धोती व कुर्ता घातलला होता.

एकेकाळी नयनतारा प्रभूदेवाच्या प्रेमात होती. काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं अफेअर मोठं चर्चिलं गेलं होतं. प्रभूदेवासाठी नयनतारा धर्म बदलण्यास तयार होती. इतकंच नाही तर प्रभूदेवानेही आपल्या पत्नी, मुलांना एकटं सोडलं होतं. मात्र, काही काळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यावर ही जोडी विभक्त झाली होती.

Web Title: nayanthara spotted with husband vignesh shivan after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.