'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:19 IST2023-09-25T11:18:45+5:302023-09-25T11:19:56+5:30

नयनताराला कमी स्क्रीनटाईम दिल्याने ती नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर खुद्द शाहरुख खाननेच मौन सोडलं आहे.

nayanthara got less screentime in jawan shahrukh khan himself accepts the fact | 'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...'

'जवान' मध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम? स्वत: किंग खाननेच केलं कबुल, म्हणाला, 'दुर्दैवाने...'

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'जवान' (Jawan) चं यश एन्जॉय करतोय. सिनेमाने काहीच दिवसात कोट्यवधी रुपयांची कमाई करत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. संपूर्ण सिनेमा हा शाहरुखच्याच अवतीभोवती फिरतो. तर किंग खानसोबत पहिल्यांदाच दिसलेली साऊथ ब्युटी नयनताराचीही (Nayanthara) खूप चर्चा झाली. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर शाहरुखची लेडी लक दीपिका पदुकोणच (Deepika Padukone) आपल्या स्पेशल अॅपिअरन्सने भाव खाऊन गेली. फायनल एडिटमध्ये नयनताराला कमी स्क्रीनटाईम दिल्याने ती नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर खुद्द शाहरुख खाननेच मौन सोडलं आहे.

काय म्हणाला शाहरुख खान? 

शाहरुख खानला ट्विटरवर आस्क 'एसआरके' सेशनमध्ये मध्ये एका चाहतीने लिहिले, 'मला आजाद आणि सुजीचा बाँड खूप आवडला. सिंगल मदरची स्टोरी खूप छान पद्धतीने मांडली. प्रत्येक महिलेचं प्रतिनिधित्व करणारी कथा दाखवल्याबद्दल आभार. खूप प्रेम शाहरुख.' 

चाहतीच्या या ट्वीटवर किंग खानने लिहिले, 'मलाही असंच वाटत की सिंगल मदर नर्मदाची गोष्ट अप्रतिम आहे. दुर्देवाने कथेच्या गरजेनुसार तिला जास्त स्क्रीनटाईम मिळू शकला नाही. परंतु जे आहे तेही अद्भुत आहे.'

नयनताराने 'जवान'मध्ये महिला पोलिस अधिकारीची भूमिका साकारली आहे. हा नयनताराचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असून ती यामध्ये एकदम डॅशिंग लुकमध्ये दिसली आहे. तसंच किंग खानसोबतची तिची केमिस्ट्रीही मस्त आहे. 'चलेया' या गाण्यातून ती दिसून येते. नयनतारा जरी मुख्य अभिनेत्री असली तरी केवळ पाहुणी कलाकार असलेल्या दीपिकालाच सिनेमात जास्त भाव मिळाला आहे. हे स्वत: शाहरुखने एका मुलाखतीत कबूल केले होते.

Web Title: nayanthara got less screentime in jawan shahrukh khan himself accepts the fact