Nayanthara and Vignesh Shivan's wedding : साऊथची ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा अडकली लग्नबंधनात, समोर आला पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:48 PM2022-06-09T15:48:42+5:302022-06-09T15:53:58+5:30

Nayanthara and Vignesh Shivan's wedding : महाबलिपुरम येथे नयनतारा व विग्नेश यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

Nayanthara and Vignesh Shivan's wedding tied the knot on June 9 in Mahabalipuram | Nayanthara and Vignesh Shivan's wedding : साऊथची ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा अडकली लग्नबंधनात, समोर आला पहिला फोटो

Nayanthara and Vignesh Shivan's wedding : साऊथची ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा अडकली लग्नबंधनात, समोर आला पहिला फोटो

googlenewsNext

Nayanthara and Vignesh Shivan's wedding : साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara ) आज 9 जून रोजी लग्नबंधनात अडकली. साऊथचा लोकप्रिय दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) तिनं लग्नगाठ बांधली. महाबलिपुरम येथे नयनतारा व विग्नेश यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

नयनताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा पहिला फोटो शेअर केला आहे. लग्नात नयनतारा कमालीची सुंदर दिसत होती. पिंक कलरचा ड्रेस, त्यावर साजेसे कुंदनचे दागिने असा तिचा थाट होता. फोटोत विघ्नेश नयनताराच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसतोय. नयनताराच्या लग्नाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

नयनतारा व विग्नेश गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासून चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची उत्सुकता होती. आज अखेर या जोडप्याने लग्नगाठ बांधत सवार्नांच सुखद धक्का दिला.

या लग्नात साऊथचे अनेक बडे स्टार सहभागी झालेत. विजय सेतुपति, दिग्दर्शक मणिरत्नम, अभिनेता सूर्या, कार्थी आणि अभिनेत्री ज्योतिका असे काही हाय प्रोफाइल व-हाडी या लग्नात सहभागी झाले होते. बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान यानेही या लग्नाला हजेरी लावली. नयनतारा व शाहरूख हे दोघे लवकरच ‘जवान’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

साऊथ चित्रपटसृष्टीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून नयनताराला ओळखलं जातं.  नयनतारा आणि विग्नेश यांनी 2015 मध्ये तामिळ फिल्म ‘नानुम राउडी धान’मध्ये एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Web Title: Nayanthara and Vignesh Shivan's wedding tied the knot on June 9 in Mahabalipuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.