लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे साऊथची अभिनेत्री नयनतारा, कोण आहे तिचा होणारा पती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 03:48 PM2022-05-07T15:48:50+5:302022-05-07T15:54:36+5:30

Nayanthara and Vignesh Shivan Marriage : अभिनेत्री नयनतारा काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. ती त्यांच्या या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याची तयारी करत आहे.

Nayanthara and Vignesh Shivan are ready to tie the knot will get married on 9 June 2022 | लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे साऊथची अभिनेत्री नयनतारा, कोण आहे तिचा होणारा पती?

लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार आहे साऊथची अभिनेत्री नयनतारा, कोण आहे तिचा होणारा पती?

googlenewsNext

सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचा सीझन आहे. अनेक स्टार कपल्सची लग्ने पार पडली तर काही कपल्स लग्नाची तयारी करत आहेत. गेल्या महिन्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं लग्न झालं. त्यानंतर आता साऊथ इंडस्ट्रीतून एका मोठ्या लग्नाची बातमी समोर येत आहे. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराही (Nayanthara) आता लग्न करणार आहे. 

नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री नयनतारा काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) लग्न करण्यासाठी तयार आहे. ती त्यांच्या या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याची तयारी करत आहे.

रिपोर्ट्सनुसार, नयनतारा आणि विग्नेश पुढील महिन्यात ९ जून रोजी लग्न करण्याचा प्लान करत आहे. साऊथ सिने इंडस्ट्रीतील पावर कपल दिग्दर्शक विग्नेश शिवन आणि अभिनेत्री नयनतारा बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता रिपोर्ट्स समोर येत आहेत की, या कपलने त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरवलं आहे. कपल पुढील महिन्यात ९ जून रोजी आंध्र प्रदेशातील तिरूमाला तिरूपती मंदिरात लग्न करू शकतं. 

रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, हे लग्न एका खाजगी समारंभात पार पडणार आहे. ज्यात केवळ परिवार आणि जवळचे मित्रच सहभागी होतील. नयनताराने विग्नेश शिवन दिग्दर्शित आणि निर्मित काथुवाकुला रेंदु काधल सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा चांगला चालला होता. सिनेमाच्या यशानंतर दोघांनी अनेक मंदिरांचा दौराही केला होता. ज्यात तिरूमाला तिरूपती मंदिराचाही समावेश होता. 

साऊथची अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. सोबत काम करता करता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. रिलेशनशिपनंतर दोघांनी २५ मार्च २०२१ मध्ये साखरपुडा केला होता. आता दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत.
 

Web Title: Nayanthara and Vignesh Shivan are ready to tie the knot will get married on 9 June 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.