नवाजुद्दीनला कान्समध्ये स्टँडिंग अवेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 19:26 IST2016-05-17T13:56:24+5:302016-05-17T19:26:24+5:30
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणजे बहुगुणी अभिनेता. त्याला आताश: कुठल्याही परिचयाची गरज उरलेली नाही. आपल्या प्रत्येक चित्रपटातून नवाजुद्दीनने अभिनयाची अमिट ...

नवाजुद्दीनला कान्समध्ये स्टँडिंग अवेशन
अ िनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणजे बहुगुणी अभिनेता. त्याला आताश: कुठल्याही परिचयाची गरज उरलेली नाही. आपल्या प्रत्येक चित्रपटातून नवाजुद्दीनने अभिनयाची अमिट छाप सोडली. फ्रान्समध्ये आयोजित कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही नवाजुद्दीनचाच बोलबाला दिसला. सोमवारी ‘रमन राघव २.०’च्या स्क्रीनिंगवेळी नवाजुद्दीनसोबत विक्की कौशलला स्टँडिंग अवेशन मिळाले. सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट ‘रमन राघव २.०’ हा कुख्यात सिरिअल किलर रमन राघव याच्या जीवनावर आधारित आहे. अनुराग कश्यपने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. बॉक्स आॅफिसवर ‘बॉम्बे वेल्वेट’ सुपर फ्लॉप ठरल्यावर अनुराग कश्यपच्या कार्यक्षमतेवर अनेक टीकाकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘रमन राघव २.०’च्या निमित्ताने अनुरागने या सर्व टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले, असेच म्हणावे लागले. हा चित्रपट येत्या २४ जूनला रिलीज होतोय. यात नवाजुद्दीनने रमन राघवची मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. तर विक्की कौशलने एका पोलिस अधिकाºयाची भूमिका केली आहे.
![]()