Shocking! गंभीर आरोप करत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 20:22 IST2020-05-18T20:14:40+5:302020-05-18T20:22:40+5:30
त्यांच्या लग्नाला जवळपास 11 वर्षे झाली आहेत.

Shocking! गंभीर आरोप करत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस
बॉलिवूडमधील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलियाच्या नात्यात मतभेद निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आल्या होता. मीडिया रिपोर्टनुसार नवाजच्या पत्नीने त्याला घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे, या नोटीसमध्ये आलियाने घटस्फोट आणि मेनटेनन्सची मागणी केली आहे. रिपोर्टनुसार या नवाजवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. १३ मे रोजी नवाजला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसबाबत नवाजुद्दीकडून अद्याप कोणतंच वक्तव्य आलेलं नाही. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांचा 2009मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नाला जवळपास 11 वर्षे झाली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये हटके उडत होते. आलिया ही नवाजुद्दीनची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी नवाजने नैनीताल जवळील हल्दवानी येथे राहणाऱ्या शीबा नावाच्या मुलीशी लग्न केले होते.
रमजान ईद असल्याने नवाझुद्दीन त्याच्या कुटुंबियांसोबत उत्तरप्रदेशमधील मुझ्झफरनगरमध्ये ईद साजरी करण्यासाठी गेला आहे. यासाठी त्याने खास महाराष्ट्र सरकारची परवानगी घेतली आहे. एसपी देहात नेपाल सिंहने अमर उजालाला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नवाझुद्दीन त्याच्या कुटुंबियांसोबत बुढाना येथील त्याच्या घरी पोहोचला आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना सध्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.