‘मॉम’मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतले अथक परिश्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 19:57 IST2017-06-28T14:27:04+5:302017-06-28T19:57:04+5:30

अभिनेत्री श्रीदेवी हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘मॉम’ या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच साध्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे; मात्र ...

Nawazuddin Siddiqui's relentless efforts for the role of 'Mom'! | ‘मॉम’मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतले अथक परिश्रम!

‘मॉम’मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतले अथक परिश्रम!

िनेत्री श्रीदेवी हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘मॉम’ या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच साध्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे; मात्र अशातही त्याने दिग्दर्शक रवि उदयवार यांचे मन जिंकले आहे. अर्थातच या भूमिकेसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. 

रवि उदयवारला अपेक्षित असलेले काम नवाजुद्दीनने अगदीच चोखपणे पूर्ण केले आहे. चित्रपटात तो भयंकर अवतारात दिसणार असून, याकरिता त्याला बरीचशी मेहनत घ्यावी लागली आहे. कारण प्रत्येकवेळी त्याला हा अवतार धारण करण्यासाठी तब्बल चार तास मेकअप करावा लागत असे. अभिनयाची प्रचंड क्षमता असलेला नवाजुद्दीन या चित्रपटात साधा कुर्ता आणि शर्टमध्ये बघावयास मिळणार आहे. आश्चर्य म्हणजे हा कुर्ता आणि शर्ट त्याने दिल्लीच्या लोकल मार्केटमधून खरेदी केला. 

खरं तर नवाजुद्दीनने चित्रपटाचे पात्र स्वत:मध्ये इतके आत्मसात करून घेतले होते की, दिल्लीतील चॉँदणी चौकात चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना, तेथील लोकांनाही त्याला ओळखणे कठीण झाले होते. याबाबत दिग्दर्शक रवि उदयवार सांगतो की, नवाजुद्दीनला त्याचे चाहते आणि चित्रपट उद्योग एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखतात. पण मी ज्यावेळी त्याला या चित्रपटातील त्याचा लूक कसा असेल हे सांगितले तेव्हा त्याच्यामध्ये या लूकविषयी मला कमालीची उत्सुकता बघावयास मिळाली. हे पात्र साकारताना काहीतरी नवीन शिकावयास मिळेल, असा उत्साह त्याच्यात मला स्पष्टपणे दिसत होता. वास्तविक नवाजुद्दीन असा अभिनेता आहे, जो नेहमीच वेगवेगळी आव्हाने स्वीकारत असतो. 



जेव्हा नवाजुद्दीन सेटवर येत असे, तेव्हा त्याला चार तास केवळ केशभूषा आणि मेकअप करायला लागत असे. विशेष म्हणजे मेकअप करताना तो अगदी शांत बसायचा. तो दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये फिरायचा, त्यावेळी त्याचे कपडे खूपच साधे असायचे. स्थानिक दुकानातून तो खरेदी करताना साधे शर्ट खरेदी करायचा. त्यामुळे सेटवर केवळ नवाजुद्दीनच सगळ्यांच्या दृष्टीने केंद्रस्थानी असायचा. 

‘मॉम’ची मुख्य अभिनेत्री असलेल्या श्रीदेवी तर शूटिंगच्या पहिल्याच दिवसापासून ‘मला नवाजुद्दीन सिद्दीकीला भेटायचं’ असे सांगत होती. पण तिला हे जाणवलच नाही की, नवाजुद्दीन सिद्दीकी तिच्या शेजारीच उभा होता. तोही कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा अवतारात. ‘मॉम’ या चित्रपटात श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांची भूमिका आहे. हा चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Nawazuddin Siddiqui's relentless efforts for the role of 'Mom'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.