Nawazuddin Siddiqui : पत्नी आलियाचा नवाजुद्दीन सिद्दीकीवर बलात्काराचा आरोप, रडत रडत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 18:18 IST2023-02-24T18:16:54+5:302023-02-24T18:18:00+5:30
Nawazuddin Siddiqui : नवाजची पत्नी आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, पतीवर खळबळजनक आरोप केले आहेत.

Nawazuddin Siddiqui : पत्नी आलियाचा नवाजुद्दीन सिद्दीकीवर बलात्काराचा आरोप, रडत रडत म्हणाली...
Nawazuddin Siddiqui Wife Aaliya Video : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर (Nawazuddin Siddiqui ) त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाबद्दल रोज नवे खुलासे होत असताना आता नवाजची पत्नी आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, पतीवर खळबळजनक आरोप केले आहेत. पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्याविरुद्ध पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
व्हिडीओमध्ये आलिया रडताना दिसतेय. नवाजुद्दीन आपल्या पॉवर व पैशाचा गैरवापर करत माझ्यापासून माझी मुलं हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिने केला आहे. 'एक मोठा अभिनेता जो अनेकदा महान माणूस बनण्याचा प्रयत्न करतो. त्याची आई माझ्या निष्पाप मुलांना अनौरस म्हणते आणि हा दुष्ट माणूस गप्प बसतो. काल त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात पुराव्यासह बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. काहीही झाले तरी मी माझ्या निष्पाप मुलांना या निर्दयी हातात पडू देणार नाही.' असं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये आलिया म्हणते...
'नवाजने काल कोर्टात तक्रार दाखल केली आहे. त्याला त्याच्या मुलांचा ताबा हवा आहे. ज्या व्यक्तीला माझं बाळंतपण जाणवलं नाही, मुलं मोठे होईपर्यंत त्याला डायपरची किंमत किती ते माहीत नव्हतं. मुलं कशी मोठी झाली हेही त्याला कळलं नाही. त्यालाच आता माझी मुलं हवी आहेत. माझ्याकडून मूल हिसकावून त्याला दाखवून द्यायचं आहे की तो खूप चांगला बाप आहे, पण तो चांगला नाही तर एक भित्रा बाप आहे, जो आईपासून तिची मुलं हिसकावत आहे. तू मला कधीच तुझी पत्नी मानलं नाहीस, पण मी तुला नेहमीच माझा नवरा मानत आले आहे. माझ्याकडे पैसा नाही. मी सगळीकडून अडचणीत आहे. पण मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असं तिने व्हिडीओत म्हटलं आहे.