नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रोमारोमात’ भिनलीय ही मुलगी...वाचा काय आहे, मिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 13:06 IST2018-07-18T13:05:44+5:302018-07-18T13:06:19+5:30

सध्या नवाज ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. याशिवाय नवाजुद्दीनने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेला एक फोटोही चर्चेचा विषय ठरला आहे.

nawazuddin siddiqui share new photo with unknown woman | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रोमारोमात’ भिनलीय ही मुलगी...वाचा काय आहे, मिस्ट्री!

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रोमारोमात’ भिनलीय ही मुलगी...वाचा काय आहे, मिस्ट्री!

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी नवाजने आपल्या पत्नीचा सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स) काढल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. अर्थात ही बातमी खोटी असल्याचा खुलासा नवाजने केला होता. त्याआधी   नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘अ‍ॅन आॅर्डिनरी लाईफ’ या बायोग्राफीने वाद निर्माण केला होता. या वादामुळेच प्रकाशनानंतर उण्यापु-या आठ दिवसांत नवाजुद्दीनला ही बायोग्राफी बाजारातून मागे घ्यावी लागली होती. पूर्वप्रेयसींची माफी मागून नवाजने  ही बायोग्राफी बाजारातून मागे घेत असल्याचे जाहिर केले होते. ‘माझ्या बायेग्राफीमुळे ज्यांच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला या गोष्टीचा पश्चाताप असून मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे त्याने म्हटले होते. 


सध्या नवाज ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. याशिवाय नवाजुद्दीनने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेला एक फोटोही चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो पाहता पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगू लागली आहे. या फोटोत नवाज एका विदेशी तरूणीसोबत दिसतोय. ‘ये लडकी मेरे रोम-रोम में है’, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. या पोस्टवरून नवाज सध्या रोममध्ये असल्याचे स्पष्ट होते. पण त्याच्यासोबत रोममध्ये दिसलेली ही तरूणी कोण, हे सांगणे कठीण आहे. हा फोटो शेअर करून नवाजने अनेकांना अचंबित केले आहे. तूर्तास ही तरूणी नवाजच्या आगामी चित्रपटाची हिरोईन असावी असा अंदाज काढला जात आहे . क़ारण लवकरच नवाज एका रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी खरे तर अथिया शेट्टीचे नाव चर्चेत आहे.

Web Title: nawazuddin siddiqui share new photo with unknown woman