‘सेक्रेड गेम्स’मध्ये राजीव गांधींबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर; नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:03 PM2018-07-10T18:03:24+5:302018-07-10T18:03:31+5:30

सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची नेटफ्लिक्सवर प्रसारित ‘सेक्रेड गेम्स’ ही सीरिज वादात सापडली आहे. 

complaint against nawazuddin for abusing rajiv gandhi on sacred games | ‘सेक्रेड गेम्स’मध्ये राजीव गांधींबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर; नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार

‘सेक्रेड गेम्स’मध्ये राजीव गांधींबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर; नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार

googlenewsNext

सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची नेटफ्लिक्सवर प्रसारित ‘सेक्रेड गेम्स’ ही सीरिज वादात सापडली आहे. या सीरिजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करण्याचा आल्याचा ठपका ठेवत, पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या राजीव सिन्हा या काँग्रेस कार्यकर्त्याने यासंदर्भात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सीरिजच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
या सीरिजच्या एका भागात नवाजुद्दीन राजीव गांधींसाठी ‘फट्टू’ शब्दाचा वापर करताना दिसतो. सबटाईटलमध्ये हा शब्द इंग्रजीत भाषांतरित करूनही दाखवण्यात आला  आहे. राजीव गांधी यांनी बोफोर्स घोटाळा केला, अशा आशयाचा एक संवाद नवाजुद्दीन यात म्हणताना दिसतो. यावरही राजीव सिन्हा यांनी आक्षेप नोंदवला आहे.
तुम्हाला ठाऊक असेलचं की ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या नॉवेलवर आधारित आहे. मुंबईच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित ही सीरिज विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केली आहे. नवाजजुद्दीनने यात गणेश गायतोंडे या गुन्हेगाराची भूमिका साकारली आहे. तर सैफ अली खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सीरिजमध्ये अनुरागने नवाजच्या पात्रावर काम केले आहे तर मोटवानीने सैफच्या. सैफ व नवाजशिवाय राधिका आपटे, अनुप्रिया गोयंका, राजश्री देशपांडे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: complaint against nawazuddin for abusing rajiv gandhi on sacred games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.