Nawazuddin Siddiqui: फक्त ३ तासात नवाजुद्दीन सिद्दीकीचा झाला कायापालट, स्त्रीवेशातला व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 16:18 IST2022-12-13T16:18:13+5:302022-12-13T16:18:47+5:30
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' चित्रपटाचे पोस्टर समोर आले तेव्हाही त्याच्या लूकची चर्चा झाली होती.

Nawazuddin Siddiqui: फक्त ३ तासात नवाजुद्दीन सिद्दीकीचा झाला कायापालट, स्त्रीवेशातला व्हिडीओ होतोय व्हायरल
जून २०२२ मध्ये झी५ वर अर्ध नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यात रुबिना दिलैक, हितेन तेजवानी आणि राजपाल यादव दिसले, जे महिला बनून आपला उदरनिर्वाह करत होते. आता आणखी एक चित्रपट येतोय, ज्याची आधीच घोषणा झाली होती. या चित्रपटाचे नाव आहे हड्डी. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) एका महिलेचा वेश धारण करून ट्रान्सजेंडरची कथा दाखवणार आहे. मात्र, या पात्रात येण्यासाठी त्याला बराच वेळ द्यावा लागला. त्याच्या स्त्री वेशातील व्हिडीओ समोर आला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
खरे तर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' चित्रपटाचे पोस्टर समोर आले तेव्हाही त्याच्या लूकची चर्चा झाली होती. लोकांनी अर्चना पूरण सिंगशी त्याचीची तुलना केली होती. आता पुरुषाचा स्त्री बनण्याचा व्हिडीओ समोर आल्यावरही लोक तेच म्हणत आहेत. झी स्टुडिओने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नवाजुद्दीनचे संपूर्ण रूपांतर दाखवण्यात आले आहे. त्याला ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता.
मेकअप रूममध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नवाज खुर्चीवर बसून आरशाकडे पाहत असताना मेकअप आर्टिस्ट त्याचा मेकओव्हर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी तो त्याच्या चेहऱ्याचा मेकअप करतो. पूर्ण एक तास त्यात जातो. मग त्यांच्या केसांवर काम करताना दिसतो आहे. विग घातला जातो. पूर्ण केसांचा सेटमध्ये खरे केस आत ढकलले जातात.त्यातही दीड ते दोन तास लागतात. असे केल्यानंतर त्या स्त्रीवेशातील भूमिकेसाठी तयार होताना दिसतो आहे.
आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अर्चना पूरण सिंग यांचाही उल्लेख होत आहे. एकाने लिहिले - नवाद हुबेहूब अर्चना पूरण सिंग सारखा दिसत आहे. एका यूजरने म्हटले - अर्चना पूरण सिंगला थेट घेऊन गेले असते तर मेकअपचा खर्च वाचला असता. त्याचवेळी काहींनी नवाजसोबतच त्याच्या मेकअप आर्टिस्टचेही कौतुक केले. एकाने लिहिले - नवाजुद्दीनकडून अर्चना अवघ्या 3 तासात, टाळ्या.