थोडी तरी लाज बाळगा, आपली जबाबदारी ओळखा; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 14:45 IST2021-04-24T14:43:39+5:302021-04-24T14:45:12+5:30
Nawazuddin siddiqui furious over celebrities sharing photos of maldives : अनेक सेलिब्रेटी सध्या व्हॅकेशनवर गेले आहेत.

थोडी तरी लाज बाळगा, आपली जबाबदारी ओळखा; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनची चपराक
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रेटी सुट्टीवर गेले आहेत. मालदीव आणि हिल स्टेशनवर जाऊन ते सुट्टीचा आनंद घेत आहेत आणि तिथलं फोटो सोशल ते मीडियावर पोस्ट करत आहेत. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) व्हॅकेशनवर गेलेल्या सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे.
देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) बिघडत चाललेल्या परिस्थितीला घेऊन नवाजुद्दीन सिद्दीकी दु: खी आहे. अशा परिस्थितीत तो परदेशात सुट्टीचा आनंद घेत सोशल मीडियावर फोटो शेअर करणार्या अशा सेलिब्रिटींवर भडकला आहे. स्पॉटबॉयशी बोलताना तो म्हणाले, 'लोकांना अन्न नाही आणि तुम्ही पैसे फेकून एन्जॉय करत आहात. थोडी तरी लाज राखा '.
तो म्हणाला- 'ते लोक काय बोलतील? या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनविला आहे. मला नाही माहिती त्यांचे टूरिजम इंडस्ट्रीशी काय लागेबंध आहेत. पण माणुसकीच्या नात्याने तर कृपया आपल्या व्हॅकेशनचे फोटो आपल्याकडे ठेवा. इथं प्रत्येकजण कठीण काळाला सामोऱ्य जातो आहे. कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, ज्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून आणि दु:खी करु नका.
’
अभिनेता पुढे म्हणाला, "आम्ही जे एंटरटेनर्स आहोत, त्यांना थोडेसे मोठे व्हायला हवे." आपल्याला बरेच लोक फॉलो करतात त्यामुळे आपल्या आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जेव्हा नवाजला विचारण्यात आले की ती मालदीवला जाणार आहेस?, त्यावर तो म्हणाला, "बिलकुल नाही, मी माझ्या घरी बुधानामध्ये कुटुंबासमवेत आहे. हे माझे मालदीव आहे.''