Birthdya special : तुम्हाला माहिती आहे का, पहिल्या ऑडिशनमधून रिजेक्ट झाला होता नवाजुद्दीन सिद्दीकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 07:15 IST2019-05-19T07:15:00+5:302019-05-19T07:15:00+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाज आपल्याला शेवटचा फोटोग्राफ सिनेमात दिसला होता.

Birthdya special : तुम्हाला माहिती आहे का, पहिल्या ऑडिशनमधून रिजेक्ट झाला होता नवाजुद्दीन सिद्दीकी
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाज आपल्याला शेवटचा फोटोग्राफ सिनेमात दिसला होता. यात त्याने धारावीमध्ये राहणाऱ्या एका फोटोग्राफरची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान नवाजने एका किस्सा सांगितला होता. नवाजला स्ट्रगलिंगच्या दिवसांत ऑडिशन दरम्यान अनेक सिनेमांमधून रिजेक्ट करण्यात आले होते. नवाजने पहिल्यांदा ऑडिशनसाठी जेव्हा आपला फोटो पाठवला होता. त्यावेळी त्याला फोटोग्राफरच्या भूमिकेसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्याला रिजेक्ट करण्यात आले. आज नवाजचे नाव बॉलिवूडचा सर्वोत्तम अभिनेत्यांची यादीत सामील आहे.
लवकरच नवाज मौनी रॉय सोबत आपल्या बोले चूडिया’ या सिनेमात दिसणार आहे. आधी या सिनेमासाठी सोनाक्षी सिन्हा आणि श्रद्धा कपूर या दोघींच्या नावांची चर्चा होती. पण सोना व श्रद्धा दोघींनाही मात देत मौनीने बाजी मारली. मौनीने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नावचा भाऊ शामस नवाब सिद्दीकी दिग्दर्शित करतोय.
या चित्रपटाद्वारे शामस दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतोय. पेटा सिनेमातून नवाजने साऊथमध्ये डेब्यू केला आहे. नवाज यात व्हिलनची भूमिका साकारली होती. पेटाचे दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराज याला नवाजुद्दीनची काम करण्याची पद्धत आणि व्हर्सटायलिटी बघून त्याचा फॅन झाल्याचे तो म्हणाला होता.