सलमान बनणार नवाजुद्दीनचा आवाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 17:16 IST2016-07-28T11:46:37+5:302016-07-28T17:16:37+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक हरहुन्नरी कलाकार म्हणून नवाजुद्दीन ओळखला जातो. त्याची वाढती ...

सलमान बनणार नवाजुद्दीनचा आवाज!
न ाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक हरहुन्नरी कलाकार म्हणून नवाजुद्दीन ओळखला जातो. त्याची वाढती लोकप्रीयता आणि अभिनय पाहून बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार सलमान खान हा सुद्धा नवाजुद्दीनसोबत काम करण्यास उत्सूक आहे. आधी ‘किक’ आणि नंतर ‘भाईजान’मध्ये नवाजुद्दीनने सलमानसोबत स्क्रीन शेअर केली. पण आता सलमान नवाजुद्दीनला एक अनोखी भेट देणार आहे. ही अनोखी भेट म्हणजे, आपला आवाज. होय, सलमान आता नवाजचा आवाज बनणार आहे. होय, सलमानचा लहान भाऊ सोहेल याच्या ‘अली’या चित्रपटात नवाज लीड रोलमध्ये दिसणार आहे. या रोमॅन्टिक सिनेमान नवाज गोल्फर बनणार आहे. या चित्रपटात नवाजवर चित्रीत करण्यात येणाºया एका गाण्याला सलमान स्वत:चा आवाज देणार आहे. म्हणजे सलमान हे गाणे गाणार आहे. आहे ना, अनोखी भेट..!!