नवाज-श्रीदेवी दिसणार एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 22:15 IST2016-03-02T05:15:25+5:302016-03-01T22:15:25+5:30

गौरी शिंदे यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ मध्ये श्रीदेवी हिने उत्तम अभिनय साकारला होता. आता जवळपास चार वर्षांनंतर तिने नवाजुद्दीन सिद्दीकी ...

Nawaz-Sridevi will appear together! | नवाज-श्रीदेवी दिसणार एकत्र!

नवाज-श्रीदेवी दिसणार एकत्र!

री शिंदे यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ मध्ये श्रीदेवी हिने उत्तम अभिनय साकारला होता. आता जवळपास चार वर्षांनंतर तिने नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत तिने कमबॅक केले आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ‘मॉम’ असे ठरले असून चित्रपटाचे निर्माते तिचे पती बोनी कपूर हेच असणार आहेत. 

nawaj

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतात की,‘ मी दहा दिवसांपूर्वी एक चित्रपट साईन केला आहे. चित्रपटाची थ्रिलर स्क्रिप्ट वाचून मी झपाटलो गेलो आहे. माझे बरेच सीन्स यात श्रीदेवींसोबत असणार आहेत. माझ्या मते, देशातील सर्वांत बेस्ट अभिनेत्री श्रीदेवी आहे. मी त्यांचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. ‘सदमा’ आणि ‘चांदणी’ हे माझे फेव्हरेट आहेत. मी अद्याप तिला भेटलो नाही पण लवकरच भेटेल. ’ 

Web Title: Nawaz-Sridevi will appear together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.