'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:04 IST2025-08-01T19:01:33+5:302025-08-01T19:04:55+5:30

71st national Film Awards: शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान

national film awards shahrukh khan and vikrant massey got best actor rani mukerji won best actress | 'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान

'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान

71st National Film Awards: मनोरंजन क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज शुक्रवारी १ ऑगस्ट २०२५ रोजी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये '12th fail' चित्रपटाने बाजी मारत राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. दरम्यान, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा भारत सरकारकडून सन्मान केला जातो. यंदा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला 'जवान' आणि विक्रांत मेस्सीला '12th फेल' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. तिच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सध्या कलाविश्वातून या कालाकारांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर '12 फेल' चित्रपटाने आपली मोहर उमटवली आहे. शिवाय या चित्रपटाने अमृता सुभाषचा गाजलेला जारण सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. शिवाय या चित्रपटाने 'सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म' पुरस्कारही पटकावला आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाने दोन्ही कॅटेगरीमध्ये हा अवॉर्ड मिळवला आहे. तसेच 'अॅमिनल', 'सॅम बहादूर' आणि 'द केरळ स्टोरी' या चित्रपटांना देखील वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभ लवकरच पार पडणार असून, त्यावेळी भारताचे राष्ट्रपती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृतींना हा सन्मान प्रदान करतील.

Web Title: national film awards shahrukh khan and vikrant massey got best actor rani mukerji won best actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.