हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 13:21 IST2024-10-05T13:21:13+5:302024-10-05T13:21:37+5:30
लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतला. हार्दिकशी घटस्फोट घेतल्यानंतर नताशाने आता इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे.

हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविच घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतला. हार्दिकशी घटस्फोट घेतल्यानंतर नताशा तिच्या लेकाला घेऊन मूळ गावी सर्बियाला गेली होती. काही दिवसांपूर्वीच नताशा सर्बियावरुन मुंबईत परतली. हार्दिकशी घटस्फोट घेतल्यानंतर नताशाने आता इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे.
नताशाने मुंबईत येताच पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. नताशाचा सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नताशा डान्स करताना दिसत आहे. शूटिंग सेटवरील हा व्हिडिओ इन्संट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. नताशाचं कमबॅक पाहून चाहतेही खूश झाले आहेत.
नताशानेही याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. हार्दिकशी घटस्फोटानंतर नताशा एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेरे करके असं गाण्याचं नाव असून याचं पोस्टर अभिनेत्रीने शेअर केलं आहे. नताशाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
बादशहाच्या डीजे वाले बाबू गाण्यातून नताशा प्रसिद्धीझोतात आली होती. २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू असताना नताशाने हार्दिकबरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर नताशा फारशी कुठे दिसली नाही. काही प्रोजेक्ट तिने केले होते. मात्र सिनेइंडस्ट्रीत ती फारशी सक्रिय नव्हती. आता हार्दिकशी घटस्फोटानंतर नताशा पुन्हा इंडस्ट्रीत सक्रिय होणार असल्याचं दिसत आहे.