'पाहिला नाही अन् पाहणारही नाही', केरळ स्टोरीवरुन नसीरुद्दीन शाह भडकले, "हा तर सरकारचा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 08:38 AM2023-06-01T08:38:42+5:302023-06-01T08:39:52+5:30

'अफवाह', 'भीड', 'फराज' सारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर आपटले. पण...

naseeruddin shah reaction on the kerala story movie compares it with nazi | 'पाहिला नाही अन् पाहणारही नाही', केरळ स्टोरीवरुन नसीरुद्दीन शाह भडकले, "हा तर सरकारचा..."

'पाहिला नाही अन् पाहणारही नाही', केरळ स्टोरीवरुन नसीरुद्दीन शाह भडकले, "हा तर सरकारचा..."

googlenewsNext

फिल्ममेकर विपुल शहा यांचा 'द केरळ स्टोरी' सध्या खूपच चर्चेत आहे. सिनेमाचं जितकं कौतुक होतंय तितकीच सिनेमावर टीकाही होत आहे. वादात अडकलेला असतानाही चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) मात्र सिनेमाकडे वेगळ्याच नजरेने बघत आहेत. ही फिल्म बघायची इच्छाच नाही आणि बघणारही नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

'अफवाह', 'भीड', 'फराज' सारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर आपटले. पण केरळ स्टोरीने धुमाकूळ घातला आहे. लोक केरळ स्टोरीबाबत मोठमोठ्या गोष्टी करत आहेत. हा एक ट्रेंड आहे. मी अद्याप हा सिनेमा बघितलेला नाही आणि माझी बघायची इच्छाही नाही, अशी प्रतिक्रिया नसीरुद्दीन शाह यांनी दिली आहे.

हा सरकारचा कट आहे

नसीरुद्दीन शाह यांनी या ट्रेंडची तुलना जर्मनीच्या नाजीवादशी केली आहे. हिटलरचं राज्य असताना सरकार किंवा नेतेमंडळी फिल्ममेकर्सकडून स्वत:वर सिनेमा बनवून घ्यायचे. ज्यात त्यांचं कौतुक केलं असेल आणि सरकारने देशासाठी काय काय केलं हे दाखवलेलं असेल. यामुळे अनेक फिल्ममेकर्स जर्मनी सोडून हॉलिवूडला निघून जायचे. तसंच काहीसं आता इथे घडताना दिसत आहे.

मुलींचे ब्रेनवॉश करुन त्यांना ISIS मध्ये सामील करुन घेतलं जातं. केरळमधील हजारो मुलींचं अशा प्रकारे ब्रेनवॉश झालं आहे. याच पीडितांवर 'द केरळ स्टोरी'चं कथानक बेतलेलं आहे. सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला होता. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच चर्चांना उधाण आलं होतं. रिलीजनंतर कित्येक आठवडे उलटले तरी ही चर्चा काही थांबत नाही. मात्र वादात असतानाही प्रेक्षकांना सिनेमा आवडला आहे.  तर कमल हसनसोबतच काही कलाकारांनी फिल्म प्रोपगंडा असल्याचं म्हटलं आहे. यामुळे सोशल मीडियावरही सिनेमावर टीकाटिप्पणी सुरुच आहे.  

Web Title: naseeruddin shah reaction on the kerala story movie compares it with nazi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.