/>. राजेश खन्ना हे पहिले व शेवटचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अधिक काळ प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. ट्विटरवर सलीम यांनी म्हटले आहे की, एक अभिनेता माझ्या घरापासून जात असताना, सलमानसाठी चाहत्यांनी घरासमोर मोठी गर्दी केल्याचे पाहून, त्याने मला कॉल करुन सांगितले होते की, चाहत्यांची एवढी गर्दी मी अजून कोणत्याही अभिनेत्याच्या घरी बघीतली नाही. त्यावर सलीम खानने उत्तर दिले की, यापेक्षाही चाहत्यांची मोठी गर्दी मी राजेश खन्नाच्या घराच्या बाहेर अनेकदा बघीतली आहे. खन्नाला कुणी सुमार अभिनेता म्हणत असेल पण टॅलेंट शिवाय कु णीही एवढे मोठे शिखर गाठू शकत नाही.