नर्गिसला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 11:31 IST2016-09-25T11:28:34+5:302016-09-26T11:31:10+5:30
नर्गिस फाखरीच्या नखऱ्यांची मीडियामध्ये खमंग चर्चा सुरू आहे. नर्गिस जिथे जातेय तिथे तोंडाला स्कार्फ बांधून ठेवते. अनेक लोकांना ती थेट ...

नर्गिसला वाटतेय ‘या’ गोष्टीची भीती !
र्गिस फाखरीच्या नखऱ्यांची मीडियामध्ये खमंग चर्चा सुरू आहे. नर्गिस जिथे जातेय तिथे तोंडाला स्कार्फ बांधून ठेवते. अनेक लोकांना ती थेट भेटण्याचे टाळतेय. तिच्या डोक्यात स्टारडम गेल आहे असे देखील चर्चा होतायेत. तिने स्वत: अशा वागण्याचे कारण जाहीर केले आहे. चक्क तिला मुंबईच्या हवेची आणि पाण्याची प्रचंड भीती वाटतेय. इतकच नाहीतर श्वास घेण्याचीसुद्धा तिला भीती वाटतेय.म्हणून तर ती ‘हाऊसफुल ३’च्या प्रचारातून अचानक भारतातून निघून गेली होती. कारण वाढत्या प्रदुषणामुळे ती आजारी पडली होती. पुन्हा आजारी न पडण्यासाठी ती सध्या अतिकाळजी घेत आहे.एवढेच काय तर ती फाईव्ह स्टार हॉटेलमध्येसुद्धा स्कार्फ बांधते आणि स्वत:चे पाणी जवळ बाळगते. बाहेर खाण्याचे तर ती टाळते.