ब्रेकअपमुळं नर्गिस डिप्रेस ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 13:19 IST2016-05-13T07:49:37+5:302016-05-13T13:19:37+5:30

'अझर' सिनेमात साकारलेल्या संगीता बिजलानीच्या भूमिकेमुळं अभिनेत्री नर्गिस फाखरीची बी-टाऊनमध्ये चर्चा आहे.. मात्र असं असूनही नर्गिस सध्या तणावात आहे. ...

Nargis Depression due to breakup? | ब्रेकअपमुळं नर्गिस डिप्रेस ?

ब्रेकअपमुळं नर्गिस डिप्रेस ?

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: Mangal, serif; font-size: 12.8px; line-height: normal; text-align: justify;">'अझर' सिनेमात साकारलेल्या संगीता बिजलानीच्या भूमिकेमुळं अभिनेत्री नर्गिस फाखरीची बी-टाऊनमध्ये चर्चा आहे.. मात्र असं असूनही नर्गिस सध्या तणावात आहे. याला कारण आहे ते अभिनेता उदय चोप्राशी झालेलं ब्रेकअप. गेल्या काही वर्षांपासून दोघांच्या अफेअरच्या खुमासदार चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु होत्या.. मात्र दोघांत ब्रेकअप झालं आणि नर्गिस अपसेट झाली.

यामुळंच तिनं महिन्याभराची सुट्टी घेतलीय. या सुट्टीमुळं ती हाऊसफुल्ल-3 सिनेमाच्या प्रमोशनमध्येही सहभागी होऊ शकणार नाही. या सुट्टीमागे ब्रेकअपचं कारण नसून 'अझर' सिनेमा करताना आलेला थकवा आणि जखमा कारणीभूत असल्याचं नर्गिसकडून सांगण्यात आलंय. नर्गिस एकावेळी तीन तीन सिनेमांचं शूट करत होती.

त्यातच अझरच्या शुटिंगवेळी नर्गिसला विविध दुखण्यांनी त्रास दिला.. यावर उपचारासाठी काही अवधी हवा असल्याचं नर्गिसकडून सांगण्यात आलंय. महिन्याभरात यावर उपचार करुन रितेशनच्या बॅन्जो सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करणार असल्याचंही नर्गिसनं स्पष्ट केलंय.. आता नर्गिसच्या डिप्रेशनचं खरं कारण काय हे मात्र गुदस्त्यातच आहे.

Web Title: Nargis Depression due to breakup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.