अवघ्या इतक्याशा रुपयांत झाले होते नाना पाटेकर यांचे लग्न, एका शोसाठी मिळायचे फक्त 50 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:10 IST2020-03-02T15:59:23+5:302020-03-02T16:10:02+5:30

काही वर्षांतच दोघे वेगळे झाले.

Nana Patekar's wedding was done in such a small amount | अवघ्या इतक्याशा रुपयांत झाले होते नाना पाटेकर यांचे लग्न, एका शोसाठी मिळायचे फक्त 50 रुपये

अवघ्या इतक्याशा रुपयांत झाले होते नाना पाटेकर यांचे लग्न, एका शोसाठी मिळायचे फक्त 50 रुपये

नाना पाटेकर यांनी आज मराठी, बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अग्निसाक्षी, क्रांतीवीर या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांना आजवरच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले असून त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आज त्यांनी क्रांतीवीर, वेलकम, परिंदा, अग्निसाक्षी, राजू बन बया जंटलमॅन, तिरंगा, अपहरण यांसारख्या अनेक हिंदी तर नटसम्राट, सिंहासन, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटेः द रिअल हिरो, आपला मानूस यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.


नानांच्या व्यवसायिक आयुष्यासोबत नेहमीच नानांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिले आहे. नाना यांचे लग्न नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झाले होते. नाना आणि नीलकांती यांनी प्रेमविवाह केला होता. लग्न झाले त्यावेळी नाना २७ वर्षांचे होते. लग्नाच्यावेळी नीलकांती नानांपेक्षा अधिक कमवत होत्या. त्यावेळी त्या बँकेत नोकरीला असून त्यांचा पगार अडीज हजार रुपये होता तर नाना केवळ साडे सातशे रुपये कमवत होते. नाना आणि नीलकांती यांच्या लग्न फक्त 750 रुपयांत झाले होते. ऐनढेच नाही तर एका मुलाखती दरम्यान नाना म्हणाले होते की, 750 रुपयांत लग्न होऊन 24 रुपये शिल्लक राहिले होते. यातून आम्ही पाहुण्यांसाठी एका छोट्या पार्टीचेदेखील आयोजन केले होते.  


नानांच्या करियरमध्ये नीलकांती नेहमीच त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच नाना पाटेकर यांना अभिनय क्षेत्रात यश मिळवता आले. नीलकांती देखील एक अभिनेत्री असून त्यांनी आत्मविश्वास या चित्रपटात काम केले आहे.


नीलकांती आणि नाना यांना मल्हार हा मुलगा असून त्याला अनेकवेळा नानांसोबत पाहायला मिळते. नाना आणि नीलकांती गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत.

Web Title: Nana Patekar's wedding was done in such a small amount