मेकअपवरून डिवचणा-याला नम्रता शिरोडकरने दिले त्याच्याच भाषेत उत्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 15:33 IST2019-05-12T15:31:45+5:302019-05-12T15:33:57+5:30
एक सेल्फी नम्रताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. पण हे काय? हा सेल्फी शेअर केला नि नम्रता ट्रोल झाली. कारण काय तर ‘नो मेकअप लूक’.

मेकअपवरून डिवचणा-याला नम्रता शिरोडकरने दिले त्याच्याच भाषेत उत्तर!!
बॉलिवूडची एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या कुठेय? तर पती महेश बाबू याचे यश सेलिब्रेट करतेय. होय, नम्रताचा पती महेश बाबू साऊथ इंडिस्ट्रीचा मोठा स्टार आहे. त्याचा ‘महर्षी’ हा सिनेमा अलीकडे प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नव-याच्या याच यशाचा आनंद साजरा करणारा एक सेल्फी नम्रताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. पण हे काय? हा सेल्फी शेअर केला नि नम्रता ट्रोल झाली. कारण काय तर ‘नो मेकअप लूक’. होय, या फोटोत नम्रता ‘नो मेकअप लूक’मध्ये आहे. तिला असे पाहून एका युजरने तिला डिवचले. पण नम्रताने या डिवचणा-या युजरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले.
नम्रता तू थोडं मेकअप का करत नाही? तू डिप्रेशनमध्ये तर नाहीस?, असा खोचक सवाल या युजरने केला. ही कमेंट नम्रताने वाचली आणि संबधित युजरचा चांगलाच समाचार घेतला.
‘ कदाचित तुला मेकअप केलेल्या महिलाआवडत असतील. असे असेल तर माझ्या मते, दिवसभर मेकअप करत मिरवणाºया लोकांनाच तू फॉलो कराया हवे. तशी व्यक्ती तुला या पेजवर सापडणार नाही, त्यामुळे तू इथून निघून गेलेलाच बरा,’ असे नम्रताने त्याला सुनावले. नम्रताने दिलेल्या या उत्तराचे अनेकांनी कौतुक केले आहे. तिचा साधेपणा हेच तिचे सौंदर्य असल्याची प्रतिक्रिया यानंतर अनेकांनी दिली आहे.
फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलेल्या नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नाच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. त्यानंतर लगेचच तिने तेलुगु चित्रपट ‘वामसी’ साइन केला. यात महेशबाबू तिच्यासोबत लीडरोलमध्ये महेश बाबू होता. याच चित्रपटाच्या सेटवर नम्रता व महेशबाबूची मैत्री झाले. पुढे प्रेम आणि नंतर लग्न झाले.