'धडक' सिनेमाच्या टीमला नागराज मंजुळेंनी अशा दिल्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:52 IST2018-07-19T13:52:19+5:302018-07-19T13:52:23+5:30

धडक हा 'सैराट' या गाजलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. नागराज मंजुळे यांनी या हिंदी सिनेमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Nagraj Manjule gives wishes to Dhadak team, Specially Janhavi kapoor | 'धडक' सिनेमाच्या टीमला नागराज मंजुळेंनी अशा दिल्या शुभेच्छा!

'धडक' सिनेमाच्या टीमला नागराज मंजुळेंनी अशा दिल्या शुभेच्छा!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'धडक' हा सिनेमा उद्या रिलीज होणार आहे. या सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. कारण हा सिनेमा 'सैराट' या गाजलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. नागराज मंजुळे यांनी या हिंदी सिनेमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

'सैराट' सिनेमाचे दिग्दर्शक-लेखक नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट लिहीली असून त्यातून त्यांनी 'धडक'च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी जान्हवी कपूरला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. या सिनेमात जान्हवीसोबत इशान खट्टर हा अभिनेता दिसणार आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलंय.

Web Title: Nagraj Manjule gives wishes to Dhadak team, Specially Janhavi kapoor