जान्हवी कपूरमुळेच नागराज मंजुळेने करण जोहरला मदत करण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 17:23 IST2017-09-14T11:53:24+5:302017-09-14T17:23:24+5:30

मराठीमध्ये आलेल्या ‘सैराट’ने केवळ मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर देशातील तमाम भाषेतील प्रेक्षकांना वेड लावले. त्यामुळेच निर्माता तथा दिग्दर्शक करण ...

Nagaraj Manjule denies giving permission to Johar to help Johanvi Kapoor | जान्हवी कपूरमुळेच नागराज मंजुळेने करण जोहरला मदत करण्यास दिला नकार!

जान्हवी कपूरमुळेच नागराज मंजुळेने करण जोहरला मदत करण्यास दिला नकार!

ाठीमध्ये आलेल्या ‘सैराट’ने केवळ मराठी प्रेक्षकांनाच नव्हे तर देशातील तमाम भाषेतील प्रेक्षकांना वेड लावले. त्यामुळेच निर्माता तथा दिग्दर्शक करण जोहर आता हिंदीमध्ये ‘सैराट’ घेऊन येत असून, यामध्ये आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बघावयास मिळणार आहे. मात्र ही बाब मराठी ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना फारशी भावली नसल्याचे दिसून येत आहे. कारण जेव्हा करण जोहर नागराजकडे हिंदी ‘सैराट’च्या निर्मितीसाठी मदत मागण्यास गेला, तेव्हा नागराजने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. नकाराचे कारण जेव्हा विचारण्यात आले तेव्हा जान्हवी कपूर हेच नकाराचे कारण असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

हिंदी ‘सैराट’मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्ट प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार असून, या चित्रपटाची करण जोहरच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत निर्मिती केली जाणार आहे. जान्हवीचा हा डेब्यू चित्रपट असल्याने सगळ्यांनाच तिला मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी उत्सुकता लागली आहे. दरम्यान, करणला या चित्रपटासाठी नागराजची मदत हवी होती. करणला असे वाटत होते की, नागराजने त्याला हिंदी सैराटसाठी मदत करायला हवी. परंतु नागराजने त्यास नकार दिला आहे. डीएनए रिपोर्टनुसार, नागराजच्या नकाराचे एकमेव कारण म्हणजे जान्हवी कपूर आहे. चित्रपटात जान्हवीची भूमिका एका गावातील मुलीची असेल. मात्र तिचा लूक या भूमिकेशी कुठेच साम्य साधणारा नाही. शिवाय जान्हवी खूपच मॉडर्न असल्याने प्रेक्षक तिला गावाकडच्या मुलीच्या रूपात स्वीकारतील काय? असा प्रश्न आहे. त्याचबरोबर चित्रपटात मुलाची भूमिका साकारणारा ईशानदेखील शहरी अंदाजाशी जोडलेला आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा पाहता ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेलच, असे नागराजला वाटत नाही. त्यामुळेच त्याने करणला मदत करण्यास नकार दिला आहे. 

ALOS READ : नागराज मंजुळेने ‘सैराट’साठी करण जोहरला मदत करण्यास दिला नकार!

दरम्यान, नागराज सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. या प्रोजेक्टमध्ये तो महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करीत आहे. तसेच सूत्रानुसार, श्रीदेवीदेखील आपल्या मुलीच्या गावाकडील भूमिकेविषयी फारशी सकारात्मक नाही. तिच्या मते, प्रेक्षकांना असे वाटायला हवे की, एक अभिनेत्री गावाकडच्या मुलीची भूमिका साकारत आहे. लोकांनी जान्हवी गावाकडची मुलगी आहे, असा अजिबातच कयास लावू नये, असे श्रीदेवीला वाटते. दरम्यान, नागराजने आता या प्रोजेक्टपासून दूर राहणे पसंत केल्याने, करण त्याची कशी निर्मिती करतो हे बघणे मजेशीर असेल. 

Web Title: Nagaraj Manjule denies giving permission to Johar to help Johanvi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.