Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतायेत एन्जॉय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:59 IST2022-11-26T13:40:45+5:302022-11-26T13:59:56+5:30

सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताचा फोटो व्हायरल होतोय. दोघेही परदेशात एकत्र व्हेकॅशन एन्जॉय करतायेत.

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala photo goes viral on social media | Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतायेत एन्जॉय?

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा फोटो व्हायरल, विदेशात व्हॅकेशन करतायेत एन्जॉय?

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य प्रचंड चर्चेत आला होता. नागा ‘मेड इन हेवन’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र यावर कधीच त्याने प्रतिक्रिया दिली नाही. आता सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताचा फोटो व्हायरल होतोय. दोघेही परदेशात एकत्र व्हेकॅशन एन्जॉय करत असल्याचा दावा केला जात आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला(Naga Chaitanya And Sobhita Dhulipala) हे दोघेही काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. दोघेही एकत्र आनंदी दिसत आहेत. हा फोटो व्हायरल होत आहे, मात्र यासोबत त्याचे काही चाहते त्यांचा हा फोटो एडिट असल्याचं सांगत आहेत.

काही लोक हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत एडिट असल्याचं सांगतायेत. दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो आहेत, पण त्यांना एकत्र करुन कोलाज बनवण्यात आला आहे.

नागा आणि सामंथा यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.

शोभिता ही एक लोकप्रिय मॉडेल व अभिनेत्री आहे. मेड इन हेवन या सुपरहिट वेब शोमध्ये ती दिसली होती. अलीकडे महेशबाबूच्या मेजर या चित्रपटात ती दिसली होती. शोभिता हिंदी, मल्याळम, तेलगू चित्रपटात काम करते. सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.


 

Web Title: Naga Chaitanya and Sobhita Dhulipala photo goes viral on social media