माझे ‘लव्ह लाईफ ’ शेअर करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 09:22 IST2016-10-20T17:16:17+5:302016-10-21T09:22:04+5:30

‘बी टाऊन’चे सेलिब्रिटी ‘नैराश्य’ आणि ‘बॉडी शेमिंग’ याविषयी आता उघडपणे बोलू लागले आहेत. स्वत:च्या लव्ह लाईफबद्दल जाहिरपणे बोलणारे सेलिब्रिटीही ...

My 'Love Life' will not be shared | माझे ‘लव्ह लाईफ ’ शेअर करणार नाही

माझे ‘लव्ह लाईफ ’ शेअर करणार नाही

ी टाऊन’चे सेलिब्रिटी ‘नैराश्य’ आणि ‘बॉडी शेमिंग’ याविषयी आता उघडपणे बोलू लागले आहेत. स्वत:च्या लव्ह लाईफबद्दल जाहिरपणे बोलणारे सेलिब्रिटीही बॉलिवूडमध्ये आहेत.पण काही सेलिब्रिटींना मात्र पर्सनल लाईफबद्दल बोललेले फारसे आवडत नाही.

खासगी आयुष्य शक्य तेवढे खासगी ठेवण्यासाठी हे सेलिब्रिटी धडपडतांना दिसतात. परिणीती चोप्रा ही सुद्धा अशाच सेलिब्रिटींपैकी एक माझ्या कामाशी निगडीत काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करायला मला आवडेल. पण माझी लव्हलाईफ, माझ्या आयुष्यातील काही निर्णय मात्र मी पूर्णत: खासगी ठेऊ इच्छिते, असे परिणीती म्हणते.

माझ्या खासगी आयुष्याशी लोकांना घेणे देणे असायला नको, असे ती परखडपणे सांगते. स्वत:च्या आयुष्याबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असतो. कुणाला जाहिरपणे व्यक्त व्हायला आवडतं तर काही जण स्वत:चे आयुष्य खासगी ठेवू इच्छितात. मी या दुसऱ्या  प्रकारात मोडते. माझा पार्टनर, त्याचे विचार, त्याच्याबद्दलच्या माझ्या भावना या सगळ्या माझ्या खासगी आयुष्याच्या भाग आहेत. मी त्याचा आदर करायला हवा. माझ्या मते, याबाबतीत सेलिब्रिटींनी थोडसं संकुचित असायलाच हवं, असेही ती म्हणाली.

२०११ मध्ये ‘लेडिज व्हर्सेस रिकी बहेल’ चित्रपटातून परिणीतीने बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ‘ईशकजादे’, ‘दावत ए ईश्क’, ‘किल दिल’ या चित्रपटात तिने काम केले.

Web Title: My 'Love Life' will not be shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.