माझे आत्मचरित्र पारदर्शी : शत्रुघ्न सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:34 IST2016-02-21T07:34:52+5:302016-02-21T00:34:52+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक, नायक म्हणून एक काळ गाजवल्यानंतर राजकारणत स्थिरावलेल्या बिहारीबाबू शत्रुघ्न सिन्हांचे आत्मचरित्र येतेय! खामोश! होय, शत्रुघ्नच्या आत्मचरित्राचे ...

माझे आत्मचरित्र पारदर्शी : शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्नच्या आत्मचरित्राचे नावच ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ असे आहे. इतर प्रतिष्ठित प्रथितयश नेत्यांसारखे स्वस्तुती करणारे हे आत्मचरित्र नाही. माझे हे पुस्तक पारदर्शी आणि प्रामाणिक घटनांचा आढावा घेणारे आहे, असे शत्रुघ्नने म्हटले आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शुक्रवारी या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
तब्बल ३३८ पृष्ठांच्या या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातील बºया-वाईट घटनांचा तटस्थपणे आढावा घेण्यात आला आहे. प्रसिद्ध लेखक, भाष्यकार भारती एस. प्रधान यांनी या चरित्राचे लेखन आणि संपादन केले आहे. त्यांनी तब्बल ७ वर्षे अभ्यास करून, ३७ मुलाखती घेऊन शत्रुघ्नचे चरित्र मांडले आहे. तब्बल दोनशे तासांच्या ध्वनिफिती त्यांनी ऐकल्या व त्यातील घटनांचाही या पुस्तकात समोवश केला आहे.
शत्रुघ्नच्या खासगी छायाचित्रकाराच्या आठवणींचीही दखल त्यात घेण्यात आली आहे. ‘‘आपल्या देशात लोकशाही आहे आणि मला जे काही म्हणायचे आहे, ते मी त्यात लिहिले आहे, त्यामुळे ते मनोरंजक तर असेलच पण खळबळजनकही असेल, त्यामुळे त्याची विक्री तडाखेबंद होईल’’, असेही शत्रुघ्नने म्हटले आहे! तेव्हा खामोश!