MUST WATCH : ​‘जॉली एलएलबी2’ मध्ये नसलेला पण अक्षयने शेअर केलेला ‘डिलिटेड व्हिडिओ’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 17:12 IST2017-02-20T11:42:37+5:302017-02-20T17:12:37+5:30

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा ‘जॉली एलएलबी2’ तुम्ही पाहिलाच असेल. पण आम्हाला खात्री आहे, आम्ही जे काही तुम्हाला दाखवणार आहोत, ते तुम्ही चित्रपटात कितीही शोधले तरी तुम्हाला सापडणारे नाही. होय, आम्ही आज तुम्हाला ‘जॉली एलएलबी2’ मधील एका डिलिटेड सीनचा व्हिडिओ दाखवणार आहोत.

MUST WATCH: 'Jolly LLB 2' but 'Deleted Video' shared by Akshay! | MUST WATCH : ​‘जॉली एलएलबी2’ मध्ये नसलेला पण अक्षयने शेअर केलेला ‘डिलिटेड व्हिडिओ’ !

MUST WATCH : ​‘जॉली एलएलबी2’ मध्ये नसलेला पण अक्षयने शेअर केलेला ‘डिलिटेड व्हिडिओ’ !

लिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा ‘जॉली एलएलबी2’ तुम्ही पाहिलाच असेल. पण आम्हाला खात्री आहे, आम्ही जे काही तुम्हाला दाखवणार आहोत, ते तुम्ही चित्रपटात कितीही शोधले तरी तुम्हाला सापडणारे नाही. होय, आम्ही आज तुम्हाला अन्नू कपूर, सौरभ शुक्ला आणि अक्षय कुमार यांचा एक व्हिडिओ दाखवणार आहोत. हा व्हिडिओ कुठलाही प्रमोशन फंडा नाही तर ‘जॉली एलएलबी2’ मधील एका डिलिटेड सीनचा व्हिडिओ आहे.
होय, अक्षय कुमारने त्याच्या सोशल अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अन्नू कपूर, सौरभ शुक्ला आणि अक्षय कुमार असे तिघेही दिसतात. कोर्टात दुपारच्या भोजनादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. अन्नू कपूर येतात. त्यांना सगळे जण जेवत असलेले दिसतात. त्यामुळे ‘अरे वा, इथे तर सगळे जेवत आहेत,’असे ते म्हणतात. त्यांच्या या वाक्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात, असे या व्हिडिओमध्ये दिसते. हा सीन चित्रपटातून वगळण्यात आला आहे. पण अक्षयने हा वगळण्यात आलेला सीन पाहण्याची संधी तुम्हाला दिली आहे.



ALSO READ : ​‘जॉली एलएलबी २’च्या निर्मात्यांची माघार; चार कटसह रिलीज होणार चित्रपट
बॉलिवूडचे हे धुरंधर ‘वकील’ तुम्हाला माहित आहेत का?

 ‘जॉली एलएलबी2’ने पहिल्या दिवशी शुक्रवारी १३.२० कोटी, दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी १७.३१ कोटी तर तिस-या दिवशी रविवारी १९.९५ कोटी, सोमवारी ७.२६ कोटी आणि मंगळवारी ९.०७ कोटींचा गल्ला जमविला आहे.  रिलीजच्या दुसºया आठवड्यात या चित्रपटाने ८८.२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचा एकूण बजेट ७८ कोटी रुपए आहे. यापैकी १५ कोटी रुपए मार्केटींगवर खर्च करण्यात आले आहेत तर ३५ ते ४० कोटी निव्वळ अक्षय कुमारच्या फीवर.

Web Title: MUST WATCH: 'Jolly LLB 2' but 'Deleted Video' shared by Akshay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.