‘द कपिल शर्मा शो’मध्ये रुस्तम लावणार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 13:04 IST2016-07-28T07:34:18+5:302016-07-28T13:04:18+5:30
विनोदवीर कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपट ‘रुस्तम’च्या प्रसिद्धीसाठी लवकरच हजेरी लावणार आहे. कपिल शर्माची लोकप्रियता ...
.jpg)
‘द कपिल शर्मा शो’मध्ये रुस्तम लावणार हजेरी
अभिनेत्री जॅकलीन आणि ‘ढिशूम’ चित्रपटाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असतानाच आता अभिनेता अक्षय कुमारनेही ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्ये न जाता कपिलच्या मोहल्ल्यातील हास्यमैफलीला हजेरी लावण्याचे ठरवले आहे. अक्षय कुमारचा आगामी सिनेमाचे कथानक आणि त्याच्या पात्राची गंभीरता पाहता ‘रुस्तम’च्या कथानकाचा अपमान होऊ नये म्हणूनच ‘रुस्तम’च्या प्रसिद्धीसाठी अक्षयने ‘द कपिल शर्मा शो’ला जाण्याचे ठरवले आहे, असे समजते.