'मुन्नाभाई MBBS' मधील स्कॉलर स्वामी आता ओळखूही येईना, लेटेस्ट फोटो पाहून अवाक् झाले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 15:18 IST2022-03-08T15:16:33+5:302022-03-08T15:18:34+5:30

विरल भयानीच्या ऑफिशिअल इन्स्टा पेजवर त्याचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो फारच बदललेला दिसत आहे.

Munnabhai mbbs swami aka Khurshed Lawyer latest photos viral fans could not recognise the actor | 'मुन्नाभाई MBBS' मधील स्कॉलर स्वामी आता ओळखूही येईना, लेटेस्ट फोटो पाहून अवाक् झाले फॅन्स

'मुन्नाभाई MBBS' मधील स्कॉलर स्वामी आता ओळखूही येईना, लेटेस्ट फोटो पाहून अवाक् झाले फॅन्स

२००३ साली संजय दत्तचा कॉमेडी ड्रामा 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. हा एक असा एव्हरग्रीन सिनेमा आहे जो आजही लोकांना बघायला आवडतो. या सिनेमातील सर्वच भूमिकांना फॅन्सकडून भरपूर प्रेम मिळालं होतं. या सिनेमात 'स्वामी'ची भूमिका Khurshed Lawyer ने साकारली होती. या  सिनेमात सडपातळ दिसणारा खुर्शीद लॉयरचं लूक आता आधीपेक्षा खूप बदलला आहे. विरल भयानीच्या ऑफिशिअल इन्स्टा पेजवर त्याचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो फारच बदललेला दिसत आहे.

विरल भयानीच्या पेजवर Khurshed Lawyer चा फोटो शेअर त्याच्याबाबतची माहितीही दिली आहे. फोटो शेअर करत लिहिलं की, 'तिग्मांशु धुलियाच्या हॉटस्टारवरील the great indian murder नंतर ४ वर्षानंतर खुर्शीद लॉयरने कमबॅक केलं. मुन्नाभाई एमबीबीएस मधील आपली भूमिका स्वामी आजही लोकांच्या लक्षात आहे. तो 'अजब प्रेम की गजब कहानी', 'प्यारे मोहन', 'डबल धमाल', 'बुड्ढा मर गया' मध्ये दिसला होता. आता त्याच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहिली जात आहे'.

विरल भयानीने अभिनेत्याचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो ब्लॅक कलरच्या टी-शर्टमध्ये आणि वाढलेल्या दाढीत दिसत आहे. अर्थातच त्याचं वाढलेलं वयही चेहऱ्यावर दिसत आहे. त्याचे हे लेटेस्ट फोटो पाहून फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. त्याच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत. अनेकांनी तर स्वामीचे डायलॉगही कमेंट केले आहेत.
 

Web Title: Munnabhai mbbs swami aka Khurshed Lawyer latest photos viral fans could not recognise the actor