मम्मी नितू कपूरने रणबीरला ‘राणा’ म्हणत इमोशनल ट्विटमधून केले बर्थ डे विश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:02 IST2017-09-28T11:31:37+5:302017-09-28T17:02:05+5:30

आज रणबीर त्याचा ३६वा वाढदिवस साजरा करीत असून, जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Mummy Nitu Kapoor called Ranbir a 'Rana' and 'berth de wish' made from an emotional tweet! | मम्मी नितू कपूरने रणबीरला ‘राणा’ म्हणत इमोशनल ट्विटमधून केले बर्थ डे विश!

मम्मी नितू कपूरने रणबीरला ‘राणा’ म्हणत इमोशनल ट्विटमधून केले बर्थ डे विश!

िनेता रणबीर याचा आज बर्थ डे असून, जगभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र मम्मी-पापा ऋषी कपूर आणि नितू कपूरने आपल्या लाडक्याला खूपच इमोशनल शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. वास्तविक ऋषी यांना हा दिवस आणखी एका कारणामुळे स्पेशल आहे. कारण त्यांचा ‘बॉबी’ हा पहिलाच चित्रपट याच दिवशी रिलीज करण्यात आला होता. असो, रणबीरला दिलेल्या शुभेच्छांविषयी सांगायचे झाल्यास मम्मी नितू कपूरने एक जुना फोटो शेअर करीत, आपल्या राणा अर्थात रणबीरला विश केले. नितूने शेअर केलेल्या या फोटोत ऋषी कपूर रणबीरला, तर नितू मुलगी रिद्धिमाला कडेवर घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत. 

नितूने आपल्या लाडक्या रणबीरला शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅप्पी बर्थ डे राणा, तू एक असा मुलगा आहेस, ज्याला मिळविण्याची जगातील प्रत्येक आई-वडिलांची इच्छा आहे. प्रेम करून, काळजी घेणारा आणि तेवढाच समजूतदार. भरपूर प्रेम आणि आशीर्वाद...’ यावेळी नितूने या पोस्टमध्ये रणबीरच्या सर्व फॅन क्लबचेही आभार मानले. नितूने लिहिले की, ‘यावर्षी सर्व फॅन क्लबने खूप काही केले. त्यासाठी त्यासर्वांचे धन्यवाद. तुम्ही केलेले सर्व पोस्ट रणबीरने बघितले आणि एडिट केले’ असा खुलासाही नितूने यावेळी केला. 
 

रणबीर कपूर आज त्याचा ३६वा वाढदिवस साजरा करीत आहे. बुधवारी रात्रीच मुंबई येथे रणबीरच्या बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. इम्तियाज अली, अनुराग बासू, शाहरूख खान, आमिर खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, अर्जुन कपूर आदी सेलिब्रिटींनी पार्टीत हजेरी लावली होती. रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर संजूबाबाची भूमिका साकारत आहे. 

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्याबरोबरचे त्याचे फोटो व्हायरल झाल्याने तो चर्चेत आला होता. असो, रणबीरला त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘सीएनएक्स मस्ती’ परिवाराकडून भरपूर शुभेच्छा!

Web Title: Mummy Nitu Kapoor called Ranbir a 'Rana' and 'berth de wish' made from an emotional tweet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.