मुंबई पोलिसांना आला कॉल, ‘केआरके करतोय आत्महत्या’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 17:19 IST2017-11-05T11:49:29+5:302017-11-05T17:19:29+5:30
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने कमाल राशिद खान याचे ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर त्याने अकाउंट सुरू करा अन्यथा मी आत्महत्या करणार ...
.jpg)
मुंबई पोलिसांना आला कॉल, ‘केआरके करतोय आत्महत्या’!
म यक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने कमाल राशिद खान याचे ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर त्याने अकाउंट सुरू करा अन्यथा मी आत्महत्या करणार अशा स्वरूपाची धमकी दिली होती. मात्र केआरकेची ही धमकी बºयाचशा लोकांनी फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळेच त्याने थेट एक प्रेस नोट प्रसिद्ध करून पुढच्या काही तासांत अकाउंट सुरू करा अन्यथा मी आत्महत्या करणार, असे म्हटले. केआरकेच्या या प्रेस नोटनंतर एका कॉलरने थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधून केआरके आत्महत्या करीत असल्याचे म्हटल्याने पोलिसांची एकच धांदल उडाली. पोलिसांनी केआरकेचे घर गाठत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केआरकेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याच्या मागणीवर कायम होता.
केआरकेच्या बॉक्स आॅफिस कलेक्शन नावाच्या ट्विटर अकाउंटवरही त्याने काही ट्विट केले. एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘आमच्या सूत्रानुसार वर्सोवा पोलीस ठाण्याचे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी केआरकेच्या घरी पोहोचले आहेत. पोलिसांना कोणीतरी फोन करून असे सांगितले की, केआरके आज आत्महत्या करीत आहे. या निनावी कॉलमुळेच पोलिसांनी तडकाफडकी केआरकेचे घर गाठले. वास्तविक हा कॉल कोणी केला याबाबत अद्यापपर्यंत कुठलीच माहिती समोर आली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
![]()
नेहमीच भडक ट्विट करून सेलिब्रिटींच्या नाकात दम करणाºया केआरकेने आतापर्यंत अनेक बड्या स्टार्सवर निशाणा साधला आहे. स्वत:ला सर्वात मोठा फिल्म क्रिटिक्स म्हणविणाºया केआरकेचे ट्विट बंद झाल्याने त्याच्या हाताला कुठलेच काम उरले नसल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर त्याचे ट्विट बंद झाल्याने बºयाचशा सेलिब्रिटींनी समाधानही व्यक्त केले आहे.