​मुकेश अंबानीची मुलगी इशा अंबानी घेणार बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:35 IST2017-09-11T05:05:42+5:302017-09-11T10:35:42+5:30

देशातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती म्हणजे, मुकेश अंबानी. आता मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानी हिच्याबद्दल एक बातमी आहे. होय, इशा ...

Mukesh Ambani's daughter Isha Ambani to take strong entry in Bollywood! | ​मुकेश अंबानीची मुलगी इशा अंबानी घेणार बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री !

​मुकेश अंबानीची मुलगी इशा अंबानी घेणार बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री !

शातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती म्हणजे, मुकेश अंबानी. आता मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानी हिच्याबद्दल एक बातमी आहे. होय, इशा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. अर्थात तुम्ही या ‘एन्ट्री’चा जो अर्थ घेतलाय तो मात्र चूक आहे. इशा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय. पण अ‍ॅक्टिंगमध्ये नाही तर निर्मिती क्षेत्रात. होय, इशा बॉलिवूडमध्ये प्रोड्यूसर म्हणून येतेय. करण जोहरसोबत मिळून इशा आता चित्रपटांची निर्मिती करणार आहे आणि तिचा पहिला चित्रपट असणार आहे, ‘बॅटल आॅफ सारागढी.’
 प्रारंभी सलमान खान आणि करण जोहर हे दोघे मिळून या सिनेमाची निर्मिती करणार होते. मात्र, कालांतराने सलमान या प्रोजेक्टमधून बाहेर पडला अन् सलमानच्या जागी इशाची एन्ट्री झाली.  या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी करणच्या घरी अक्षय आणि इशाची यासंदर्भात एक बैठक झाली. यावेळी इशाला या सिनेमाची कथा प्रचंड आवडली. त्यानंतर २९ आॅगस्टला पुन्हा अक्षयच्या घरी दुसरी बैठक झाली अन् हा प्रोजेक्ट मार्गी लागला. खरे तर राजकुमार संतोषी आणि अजय देवगणही ‘बॅटल आॅफ सारागढी’ वर चित्रपट करत आहेत. (सलमान व अक्षयने या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा अजय देवगण नाराज झाल्याची बातमीही आली होती.) त्यामुळे आता अक्षय विरूद्ध अजय अशी एक चढाओढ या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.   

ALSO READ : Concept एक ; कथा अनेक ! एकाच पार्श्वभूमीवर येत आहेत अनेक चित्रपट !!

 या चित्रपटाचे कथानक  १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले आहे.  या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या  २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते.  

Web Title: Mukesh Ambani's daughter Isha Ambani to take strong entry in Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.