PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात 31 रुपयांचं ORS घेताना दिसले शाहरुख अन् मुकेश अंबानी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:38 AM2024-06-11T09:38:53+5:302024-06-11T09:39:22+5:30

सध्या दोघांचा एक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Mukesh Ambani & Shah Rukh Khan Drink Rs 31 ORS at PM Modis oath-taking pics go viral | PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात 31 रुपयांचं ORS घेताना दिसले शाहरुख अन् मुकेश अंबानी, फोटो व्हायरल

PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात 31 रुपयांचं ORS घेताना दिसले शाहरुख अन् मुकेश अंबानी, फोटो व्हायरल

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये शपधविधी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी शाहरुख (Shahrukh Khan) आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Akshay Kumar) यांनीही हजेरी लावली. सध्या दोघांचा एक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मोदींच्या शपधविधी सोहळ्यामधील एक फोटो व्हायरल झाला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि शाहरुख खान हे सोहळ्यात गप्पा मारताना दिसून आले.  अंंबानी हे पाढंऱ्या रंगाच्या शर्टमध्ये पाहायाल मिळाले. तर शाहरुखने सूट परिधान केला होता. दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळाल. पण, यावेळी दोघांच्या हातातील ड्रिंक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मुकेश आणि शाहरुख हे 31 रुपये किमतीचे साधं पेय ORS पिताना दिसत आहेत.

भारतातील दोन प्रमुख व्यक्तींच्या हाती फक्त 31 रुपयांचं हे ORS पाहून नेटकरी झाले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरला.  काही नेटकऱ्यांनी हे  ORS पेय उन्हासाठी योग्य असल्याचं म्हटलं. दरम्यान अलिकेडच शाहरुखला उष्माघाताचा झटका बसला होता. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.  त्यामुळे आता दिल्लीच्या गरमीत शाहरुख काळजी घेताना दिसून आला. 

Web Title: Mukesh Ambani & Shah Rukh Khan Drink Rs 31 ORS at PM Modis oath-taking pics go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.