३ महिन्यांनी 'मुफासा: द लायन किंग' OTTवर येणार! शाहरुख-श्रेयसने आवाज दिलेला सिनेमा कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 13:30 IST2025-03-12T12:49:07+5:302025-03-12T13:30:05+5:30
'मुफासा: द लायन किंग' सिनेमाच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागली होती. पण, आता काही दिवसांतच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

३ महिन्यांनी 'मुफासा: द लायन किंग' OTTवर येणार! शाहरुख-श्रेयसने आवाज दिलेला सिनेमा कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला 'द लायन किंग' हा अॅनिमेशन सिनेमा प्रचंड गाजला. त्यानंतर ५ वर्षांनी या सिनेमाचा प्रीक्वेल असलेला 'मुफासा: द लायन किंग' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. थिएटर गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
'मुफासा: द लायन किंग' सिनेमाच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागली होती. पण, आता काही दिवसांतच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रदर्शनानंतर तब्बल ३ महिन्यांनी 'मुफासा: द लायन किंग' ओटीटीवर येणार आहे. या सिनेमाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मार्च महिन्यांतच 'मुफासा: द लायन किंग' प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.
'मुफासा: द लायन किंग' सिनेमाने जगभरात ७०९ मिलियन डॉलरची कमाई केली. द पीपलने दिलेल्या वृत्तानुसार, जिओ हॉटस्टारने 'मुफासा: द लायन किंग' सिनेमाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. येत्या २६ मार्चला हा सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरुख खान, अबराम खान, आर्यन खान, श्रेयस तळपदे, संजय मिश्रा यांनी आवाज दिला आहे.