अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे MS Dhoniची पत्नी साक्षी, जाणून घ्या त्यांच्या मैत्रीबद्दल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 18:20 IST2023-05-26T18:19:46+5:302023-05-26T18:20:18+5:30
Anushka Sharma And Sakshi Dhoni : अनुष्का शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत.

अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे MS Dhoniची पत्नी साक्षी, जाणून घ्या त्यांच्या मैत्रीबद्दल..
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिने भारतीय संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली(Virat Kohli)सोबत लग्न केले आहे. महेंद्र सिंग धोनी(Mahendra Singh Dhoni)ची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) ही अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दोघेही आसाममधील एकाच शाळेत शिकल्या आहेत. जिथे त्यांची मैत्री झाली.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिने भारतीय संघाचा क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले आहे. महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी ही अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दोघेही आसाममधील एकाच शाळेत शिकले होते, जिथे त्यांची मैत्री झाली.
दोघींनी लोकप्रिय क्रिकेटपटूंसोबत केले लग्न
विशेष म्हणजे अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी यांनी देशातील लोकप्रिय क्रिकेटपटूंशी लग्न केले असून दोघांनाही एक मुलगी आहे. अनुष्का शर्माच्या मुलीचे नाव वामिका आहे. तर साक्षीच्या मुलीचे नाव जीवा आहे. दोन्ही सेलिब्रिटी अनेकदा सोशल मीडियावर आपल्या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात.
या चित्रपटात झळकणार अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अनुष्का शर्मा चकदा एक्स्प्रेस या चित्रपटातून बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. यापूर्वी अनुष्का शर्माने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो या चित्रपटात काम केले होते. यात शाहरुख खान आणि कतरिना कैफ हे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नव्हता.